Ricky Ponting : ऋषभला डगआऊटमध्ये पाहण्यास आवडेल : पाँटिंग | पुढारी

Ricky Ponting : ऋषभला डगआऊटमध्ये पाहण्यास आवडेल : पाँटिंग

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऋषभ पंतसारखा खेळाडू झाडावर उगवत नाही, तर तो पैलू पाडून घडवावा लागतो, त्यांच्या संघात नसण्याने यंदा आम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो, तो एक पॉझिटिव्ह एनर्जीचा खेळाडू आहे, शक्य झाले तर त्याला रोज डगआऊटमध्ये पाहणे मला आवडेल, असे वक्तव्य दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) केले आहे.

भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत (Ricky Ponting) कार अपघातातून थोडक्यात बचावला होता. मात्र, या अपघातामुळे त्याच्या गुडघ्याचे तीन लिगामेंट तुटलेे होते. त्यामुळे तो पूर्णपणे फिट व्हायला बराच काळ लागणार आहे. तो आयपीएल पाठोपाठ वन-डे वर्ल्डकपलादेखील मुकणार आहे.

रिकी पाँटिंगने आयसीसीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना ऋषभ पंतची रिप्लेसमेंट मिळणे कठीण आहे. आम्हाला एक विकेटकिपर बॅटस्मन हवा आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या द़ृष्टीने ऋषभ पंत अत्यंत महत्त्वाचा आहे. पॉटिंग म्हणाला की, मी पंतला माझ्या सोबत डगआऊटमध्ये प्रत्येक दिवस, आठवडे ठेवू इच्छितो. जर तो आयपीएलदरम्यान आमच्यासोबत राहू शकला तर मी त्याला कायम डगआऊटमध्ये ठेवणार.

त्याची संघातील उपस्थिती सर्वांना प्रभावित करते. दिल्ली कॅपिटल्स नाही तर टीम इंडियालादेखील ऋषभ पंतची उणीव भासणार आहे. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पंतची उणीव भासणार आहे. ऋषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावरच भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले होते. गाबामध्ये पंतने धडाकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाकडून सामना आणि मालिका हिसकावून घेतली होती.

पंतसारख्या खेळाडूचा पर्याय मिळत नाही. या प्रकारचे खेळाडू झाडाला लागलेले नसतात. आम्ही त्याच्या पर्यायाबाबत विचार करत आहोत. आम्हाला एक विकेटकिपर फलंदाज पाहिजे आहे.
– रिकी पाँटिंग

हेही वाचा;

Back to top button