Cheteshwar Pujara : प्रथम श्रेणीत पुजाराच्या १२ हजार धावा | पुढारी

Cheteshwar Pujara : प्रथम श्रेणीत पुजाराच्या १२ हजार धावा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाला 9 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पुजाराने (Cheteshwar Pujara) आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत मोठा विक्रम केला आहे.

रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराने भारतात 12 हजार प्रथम श्रेणी धावा पूर्ण करून इतिहास रचला आहे. चेतेश्वर पुजाराने भारतात 12 हजार प्रथम श्रेणी धावा करत एक मोठा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाजही हा पराक्रम करू शकलेले नाहीत. चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) आधी वासिम जाफरने हा पराक्रम केला आहे. वासिफ जाफरने भारतात 14609 प्रथम श्रेणी धावा नोंदवल्या आहेत.

आंध्र प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी करंडक 2022-23 सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने हा विक्रम केला. या सामन्यात शानदार फलंदाजी करताना पुजाराने 91 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 240 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56 शतके आणि 73 अर्धशतकांसह 18422 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. पुजाराने भारतासाठी 98 कसोटी सामने खेळले असून 44.39 च्या सरासरीने 7014 धावा केल्या आहेत.

हेही वाचा;

Back to top button