RCB vs MI : ‘प्‍ले ऑफ’मधील मुंबईच्‍या आशा धूसर? | पुढारी

RCB vs MI : 'प्‍ले ऑफ'मधील मुंबईच्‍या आशा धूसर?

दुबई ; वृत्तसंस्था : (RCB vs MI) हर्षल पटेलची हॅट्ट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे बंगळूर रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी विजयी मिळवला. मुंबईचा संघ 18.1 षटकांत 111 धावांतच आटोपला. सुरुवात चांगली असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने मुंबईचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशा धूसर झाल्या आहेत.

सामना जिंकण्याच्या ईर्ष्येने मैदानात उतरलेले मुंबई इंडियन्सचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन-डी-कॉक या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही चौफर टोलेबाजी करीत पाचव्या षटकांत संघाचे अर्धशतक झळाकावले. डी-कॉक चांगला खेळत असताना 24 धावा करून युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलकडे झेल देऊन बाद झाला.

रोहित 43 धावांवर बाद झाल्याने मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. ठरावीक अंतराने मुंबईचे फलंदाज परतू लागले. पोलार्ड बाद झाल्यानंतर मुंबईने गाशा गंडाळला. हार्दिक पंड्या, केरॉन पोलॉर्ड आणि राहुल चहरला बाद करीत हर्षल पटेलने हॅट्ट्रिक केली.

तत्पूर्वी, (RCB vs MI) मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या बंगळूर संघाला देवदत्त पडिकलच्या रूपाने पहिला झटका बसला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रीकर भारत यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, श्रीकरला बाद करून राहुल चहरने ही जोडी फोडली.

श्रीकरने 24 चेंडूत 32 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फटकेबाजी केली. विराटने 40 चेंडूत अर्धशतक झळकावले. मॅक्सवेलने अठराव्या षटकांत 33 चेंडूंत या सीझनमधील तिसरे अर्धशतक फटकावले. अखेर बंगळूरच्या संघाने 165 धावांपर्यंत मजल मारली.

रॉयल चॅलेंजर्स बेगळूर : 20 षटकांत 6 बाद 165 (विराट कोहली 51, ग्लेन मॅक्सवेल 56. जसप्रीत बुमराह (3/36), ट्रेंट बोल्ट (1/17).

मुंबई इंडियन्स : 18.1 षटकांत सर्वबाद बाद 111 (रोहित शर्मा 43, क्विंटन-डी-कॉक 24, हर्षल पटेल 4/17, चहल 3/11, मॅक्सवेल 2/23.)

‘प्‍ले ऑफ’मधील मुंबईच्‍या आशा धूसर?

आयपीएलमधील सर्वाधिक  यशस्‍वी संघ अशी मुंबई इंडियन्‍स संघाची ओळख आहे.

यंदा या संघाला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्‍याची संधी आहे.

मात्र रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून पराभव झाल्‍यामुळे आयपीएल स्‍पर्धेच्‍या गुणतालिकेमध्‍ये मुंबई इंडियन्‍स आता सातव्‍या स्‍थानावर गेला आहे.

आतापर्यंत १० सामन्‍यात या संघाने केवळ ४ विजय मिळवत ८ गुण कमावले आहेत. तर नेट रनरेट हा ०.५५१ इतका आहे.

मुंबई इंडियन्‍सच्‍या चार लढती शिल्‍लक आहेत. हे सर्व सामने जिंकल्‍यास या संघाला १६ गुण मिळतील.

मात्र आता प्रत्‍येक सामना जिंकण्‍याबरोबरच अन्‍य संघांच्‍या सामन्‍यावरही मुंबई इंडियन्‍सच्‍याला नजर ठेवावी लागणार आहे.

आतापर्यंत चेन्‍नई आणि दिल्‍ली कॅपिटल्‍स यांनी प्रत्‍येकी १६ गुण कमावले आहेत.

त्‍यामुळे त्‍यांचे प्‍ले ऑफमधील स्‍थान निश्‍चित मानले जात आहे. मात्र मुंबई एखादा सामन्‍यामध्‍ये पराभूत झाल्‍यास त्‍यांना अन्‍य संघांच्‍या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.

हेही वाचलं का ? 

 

 

Back to top button