Rohit Sharma Record : रोहित शर्माकडून डिविलियर्सचा विक्रम मोडित, आपल्‍या नावावर केली ‘या’ विक्रमाची नोंद | पुढारी

Rohit Sharma Record : रोहित शर्माकडून डिविलियर्सचा विक्रम मोडित, आपल्‍या नावावर केली 'या' विक्रमाची नोंद

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 49 चेंडूत 42 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले असले तरी त्याने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आपल्या 42 धावांच्या खेळीत रोहितने माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.

आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9577 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने आता त्याला वनडे मध्ये मागे टाकले आहे. रोहितच्या आता वनडेमध्ये ९५९६ धावा झाल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित १७ व्या क्रमांकावर आहे. (Rohit Sharma Record)

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (Rohit Sharma Record)

1) सचिन तेंडुलकर – 463 सामने, 18426 धावा
2) कुमार संगकारा – 404 सामने, 14234 धावा
3) रिकी पाँटिंग – 375 सामने, 13704 धावा
4) सनथ जयसूर्या – 445 सामने, 13430 धावा
5) महेला जयवर्धने – 448 सामने, 12650 धावा
6) विराट कोहली – 268 सामने, 12588 धावा*
7) इंझमाम-उल-हक – 378 सामने, 11739 धावा
8) जॅक कॅलिस – 328 सामने, 11579 धावा
9) सौरव गांगुली – 311 सामने, 11363 धावा
10) राहुल द्रविड – 344 सामने, 10889 धावा
11) धोनी – 350 सामने, 10773 धावा
12) ख्रिस गेल – 301 सामने, 10480 धावा
13) ब्रायन लारा – 299 सामने, 10405 धावा
14) दिलशान – 330 सामने, 10290 धावा
15) मोहम्मद युसूफ – 288 सामने, 9720 धावा
16) ॲडम गिलख्रिस्ट – 297 सामने, 9619 धावा
17) रोहित शर्मा – 238 सामने, 9596 धावा
18) एबी डिव्हिलियर्स – 228 सामने, 9577 धावा

रोहितच्या षटकारांनी जिंकली चाहत्‍यांची मने

रोहित शर्माने आजच्‍या सामन्‍यात 3 षटकार ठोकूत चाहत्यांची मने जिंकली. ‘बीसीसीआय’ने रोहितचा षटकार मारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हिटमॅनने ज्या पद्धतीने षटकारांचा वर्षाव केला ते पाहून चाहत्यांना नाचण्याची संधी मिळाली. वास्तविक, उत्कृष्ट टायमिंगने हिटमॅनने श्रीलंके विरुद्ध 3 षटकार ठोकले. त्याने आपल्‍या नेत्रदीपक फटकेबाजीने चाहत्‍यांची मने जिंकली.


अधिक वाचा :

Back to top button