kuldeep yadav : संघातील स्थान अनिश्चित, तरीही कुलदीपचा परफॉर्मन्स 100 टक्के निश्चित

kuldeep yadav : संघातील स्थान अनिश्चित, तरीही कुलदीपचा परफॉर्मन्स 100 टक्के निश्चित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावार भारताच्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली. श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या वन डे सामन्यात त्याने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्याचवेळी, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान, शेवटच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. हे कुलदीपचे दुर्दैव आहे की चमकदार कामगिरी करूनही त्याचे टीम इंडियातील स्थान अद्याप कोणत्याही फॉरमॅटमध्ये निश्चित झालेले नाही.

चायनामन गोलंदाजाची खासियत

कुलदीप यादव सारख्या हि-याला शोधून काढण्यात माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तो डाव्या हाताचा लेग स्पिनर आहे. क्रिकेटच्या भाषेत अशा गोलंदाजाला चायनामॅन गोलंदाज म्हणतात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव चायनामन गोलंदाज आहे. जगभरातील क्रिकेटमध्ये आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके चायनामन गोलंदाज आहेत. डावखुरा फिरकीपटू कधी-कधी महागडे ठरतात हे खरे आहे. पण अशा गोलंदाजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते इतर गोलंदाजांच्या तुलनेत वेगाने विकेट घेतात. कुलदीप यादवने हे वारंवार सिद्ध केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता वन डे सामन्यात त्याने इतर गोलंदाजांच्या तुलनेत लवकर विकेट्स मिळवल्या.

दुर्दैवी कुलदीप

कुलदीपच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर नजर टाकली तर त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 200 विकेट्स घेतल्या आहेत. असे असूनही, त्याचे भारतीय क्रिकेट संघातील स्थान कोणत्याही फॉरमॅटमध्ये निश्चित झालेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या चट्टोग्राम कसोटीत सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या कुलदीपला पुढील कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. यानंतर, वन डे मालिकेतील सलग दोन सामन्यांमध्ये त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला संघात आपले स्थान निश्चित नसेल, तर याला त्याचे दुर्दैव नाही तर दुसरे काय म्हणावे?

चहल अनफिट झाला आणि कुलदीपने संधीचे सोने केले

कुलदीप यादव कधीच पहिल्या पसंतीचा गोलंदाज ठरला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीही हे पाहायला मिळाले. गेल्या एक वर्षापासून रोहित शर्मा औपचारिकपणे तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदातही कुलदीपकडे दुर्लक्ष झाले आहे. संघातील कोणताही फिरकीपटू तंदुरुस्त नसतो किंवा दुखापत होऊन बाहेर पडतो तेव्हा कुलदीपचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जातो, असे सर्वसाधारणपणे दिसून आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डेतही ही स्थिती होती. कोलकाता वन डे पूर्वी युझवेंद्र चहल अनफिट होता. परिणामी त्याच्या जागी कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हन एन्ट्री मिळाली. जर चहल तंदुरुस्त असता तर मात्र, कुलदीपला संघात स्थान मिळाले नसते, यात शंका नाही.

कुलदीपची आकडेवारी

कुलदीप यादवने 74 वनडेत 122 विकेट घेतल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने एकदा पाच आणि पाच वेळा चार बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी 25 धावांत 6 बळी अशी आहे. यासह कुलदीपने 8 कसोटीत 34 बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये तीन वेळा पाच आणि दोन वेळा चार विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. एवढेच नाही तर कुलदीपने 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 24 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी, वन डे, टी-20 आंतरराष्ट्रीय, प्रथम श्रेणी सामना, लिस्ट ए सामना असो कुलदीपने प्रत्येक डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news