Virat Kohli ट्रेंड सोशल मीडियावर अचानक का सुरु झाला ? जाणून घ्‍या कारण | पुढारी

Virat Kohli ट्रेंड सोशल मीडियावर अचानक का सुरु झाला ? जाणून घ्‍या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. ( Virat Kohli trending on Social Media ) विराट आणि जगभरातील त्‍याच्‍या कोट्यवधी चाहत्‍यांसाठी ही नवी गोष्‍ट नाही; सध्‍या श्रीलंकेविरुद्धच्‍या टी-२० मालिकेसाठी विराट कोहली संघात सहभागी नाही. तरीही तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जाणून घेवूया यामागील कारण…

Virat Kohli trending on Social Media : टीम इंडियाचे  ऐतिहासिक यश

आज ७ जानेवारी. याच दिवशी २०१९ मध्ये विराट कोहलीच्‍या नेतृत्त्‍वाखालील भारतीय संघात ऑस्‍ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्‍ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा आशिया खंडातील पहिला संघ बनला होता. (Virat Kohli trending on Social Media ) विराट कोहलीच्‍या नेतृत्त्‍वाखाली टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. या मालिकेत चेतेश्‍वर पुजाराते सर्वाधिक धावा केल्‍या होत्‍या तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्‍या होत्‍या. चार
सामन्‍यांच्‍या कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती.

 भारताने जिंकले होते दोन कसोटी सामने

टीम इंडियाने २०१९ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियात चार सामन्‍यांची कसोटी मालिका खेळली होती. ॲडलेड ओव्‍हल मैदानावर झालेल्‍या पहिल्‍या कसोटी सामना भारताने ३१ धावांनी जिंकला होता. मात्र दुसर्‍या कसोटी सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने कमबॅक करत भारताचा १४६ धावांनी पराभव केला होता. मेलबर्नमध्‍ये झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्‍यात टीम इंडियाने दमदार खेळीचे प्रदर्शन करत १३७ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहिला आणि भारताने ही कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. कसोटीमध्‍ये प्रथमच ऑस्‍ट्रेलिया संघाला त्‍यांच्‍याच मैदानावर पराभूत करण्‍याचा पराक्रम टीम इंडियाने केला होता.

संबंधित बातम्या

विराट कोहलीच्‍या विराटच्‍या नेत्तृत्‍वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अनेक विक्रम आपल्‍या नावावर केले होते. मात्र जानेवारी २०२१ मध्‍ये म्‍हणजे दोन वर्षांपूर्चीच विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. तसेच त्‍यापूर्वीच त्‍याने टी-२०चे कर्णधारपदही सोडले होते. तर वनडे कर्णधारपदावरुन विराटला हटविण्‍यात आले होते.

हेही वाचा :

 

Back to top button