Rishabh Pant Injury : ऋषभ पंत ‘ODI वर्ल्डकप’मधून बाहेर, ‘हे’ कारण आले समोर | पुढारी

Rishabh Pant Injury : ऋषभ पंत ‘ODI वर्ल्डकप’मधून बाहेर, ‘हे’ कारण आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant Injury : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटपासून दीर्घकाळ दूर राहू शकतो. आता पंतच्या गुडघा आणि घोट्याच्या शस्त्रक्रियेची बातमी समोर येत आहे. त्यामुळे तो पुढील 9 ते 10 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. अशा परिस्थितीत तो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. बीसीसीआयने बुधवारी पंतला एअरलिफ्ट करून डेहराडूनहून मुंबईला हलवले. याशिवाय गरज पडल्यास त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठवले जाण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पंतला डेहराडून येथून मुंबईत यासाठी आणले की, त्याच्याकडे बाहेरच्या लोकांचे लक्ष जाऊ. पंतला बाहेरून फारसे लक्ष जाऊ नये म्हणून डेहराडूनहून मुंबईत आणण्यात आले आहे. त्याला विश्रांतीची गरज होती आणि डेहराडूनमध्ये हे शक्य नव्हते. येथे तो उच्च सुरक्षेत असेल आणि केवळ कुटुंबातील सदस्यच त्याला भेटू शकतील. पंत दुखापतीतून बरा होताच, डॉक्टर त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवरचा पुढचा ॲक़्शन प्लॅन तयार करतील. तो प्रवासासाठी योग्य असल्याचे डॉक्टरांना वाटल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठवले जाईल, असा खुलासा त्यांनी केला. (Rishabh Pant Injury)

पंतला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप आम्हाला माहीत नाही. सूज कमी झाल्यानंतर डॉ. परडीवाला आणि त्यांची टीम उपचाराचा मार्ग ठरवतील. पंतला गुडघा आणि घोट्याच्या दोन्ही शस्त्रक्रियेची गरज आहे. त्यामुळे त्याला जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर ठेवले जाईल. सध्या सर्वांचे लक्ष पंत लवकर बरे होण्याकडे आहे. त्याला बरे होऊ द्या. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी परत येईल. हा कालावधी मोठा आहे. जेव्हा तो 100 टक्के बरा होईल, तेव्हा आपण त्याच्या पुनरागमनाबद्दल बोलू. बीसीसीआय पंतच्या उपचारासाठी आवश्यक ते सर्व पुरवेल, असेही बीसीसीआयच्या अधिका-याने सांगितले. (Rishabh Pant Injury)

Back to top button