Rishabh Pant Accident : तीन दिवसांतील 5737 किमीचा प्रवास ऋषभ पंतला भोवला!

Rishabh Pant Accident : तीन दिवसांतील 5737 किमीचा प्रवास ऋषभ पंतला भोवला!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी अपघात झाला. दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना रुरकी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. कार अपघातात पंत थोडक्यात बचावला. दुर्घटनेत पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर पंतची मर्सिडीज जीएलई कार पेट घेतला. आणि काही क्षणातच जळून खाक झाली. (Rishabh Pant Accident)

पंत नुकताच बांगला देशचा दौरा आटोपून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि इतर मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी दुबईत गेला होता. भारतात परतल्यानंतर तो कुटुंबियांना भेटण्यासाठी दिल्लीतून आपल्या घरी निघाला. तो स्वत: कार चालवत होता. त्याच्या शिवाय इतर कुणीही कारमध्ये नव्हते. दरम्यान, पंतने गेल्या तीन दिवसात बांगलादेश ते दुबई आणि दुबई ते भारत असा 5 हजार 737 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यानंतर तो रात्री कार चालवत घरी जात होता. कारने वेग पकडला त्यातच पंतला डुलकी आली आणि घात झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारवरचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. प्रसंगावधान दाखवून घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी अपघातग्रस्त कारमधून बाहेर पदण्यास पंतला मदत केली. त्यात ते यशस्वी झाले. तो बाहेर येताच कारने अचानक पेट घेतला.

अपघाताच्या काही वेळापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो काम करताना दिसत होता. बांगलादेश दौऱ्यावरून ३५४३ किलोमीटचा प्रवासकरून पंत थेट दुबईला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इतर मित्रांसोबत ख्रिसमस पार्टी करण्यासाठी पोहोचला होता. धोनीसोबत पार्टी केल्यानंतर पंत दिल्लीला रवाना झाला. काल दुबईवरून दिल्लीला २९१४ किलोमीटरचा प्रवास पंतने काल केला.

अपघातानंतर क्रिकेटपटू पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. बीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतला कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. गंभीर दुखापत झाली असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news