INDvsSL : पृथ्वीला संघात स्थान न मिळाल्याचे दुःख; सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट | पुढारी

INDvsSL : पृथ्वीला संघात स्थान न मिळाल्याचे दुःख; सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकविरूध्दच्या (INDvsSL) मालिकेसाठी पृथ्वी शॉला टीम इंडियात स्थान देण्यात आलेले नाही. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक तरुणांना संधी मिळाली. परंतु पृथ्वी शॉला पुन्हा एकदा संधी दिली गेली नाही. श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघात बदलांचा काळ सुरू असून युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण, काही खेळाडू असे आहेत की ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यावेळी देखील पृथ्वी शॉला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. (INDvsSL)

मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये पृथ्वीने कवितेच्या माध्यमातून संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रोफाईल फोटोही काढून टाकला आहे.

संघाची घोषणा झाल्यानंतर पृथ्वी शॉच्या  चाहत्यांनी त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत पृथ्वीवर अन्याय होत असल्याचे भावना व्यक्त केली आहे. पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत, मात्र टीम इंडियासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी पोस्टवर लिहित प्रतिक्रीया दिल्या आहेत.

  • भारतीय टी-20 संघ 

    हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

  • भारतीय एकदिवसीय संघ 

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

हेही वाचा;

Back to top button