

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे झालेल्या फटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेटिनाने बाजी मारली असली तरी फुटबॉलप्रेमींची मने जिंकण्याची मालिका मोरोक्कोने सुरू ठेवली आहे. फु़टबॉल विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मान मिळवलेल्या मोरोक्कोचा उपांत्य सामन्यात फ्रान्सने पराभव केला. हा पराभव पचवत मोरोक्कोच्या खेळाडूंनी संघाच्या समर्थनासाठी आलेल्या चाहत्यांसमोर जाऊन मैदानातच प्रार्थना केली होती. या नंतर त्यांच्या कृतीचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. आता विश्वचषक झाल्यानंतर मोरोक्कोच्या खेळाडूंनी आणखी एक कृती केली आहे. त्याचे देखील जगभरातून स्वागत करण्यात येत आहे. (Morocco FIFA World Cup)
उपांत्य फेरीतील पराभवानंतर स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्कोचा सामना २०१८ साली झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या संघ क्रोएशियासोबत झाला. या सामन्यातदेखील लढवय्या मोरोक्कोच्या पदरी पराभवच पडला. स्पर्धेतील चौथे स्थान मिळवलेल्या संघाला बक्षिस म्हणून सुमारे १८१ कोटी रूपये इतकी रक्कम मिळाली. (Morocco FIFA World Cup)
स्पर्धेत चौथे स्थान मिळालेल्या मोरोक्कोने बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम देशातील गरीबांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरोक्कोने विश्वचषक स्पर्धेत उलटफेर करत बलाढ्य असणाऱ्या स्पेन आणि पोर्तुगालसारख्या संघाना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांचा उपांत्यफेरीतील सामना गतविजेत्या फ्रान्सशी झाला. या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा २ – ० अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे मोरोक्कोचे फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
मोरोक्कोचा तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकता आला नसला तरी त्यांनी उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला होता. यामुळे त्यांनी आधीच फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली होती. स्पर्धेत चौथे स्थान पटकावलेल्या आता आणखी एक मनं जिंकणारी कृती केली आहे. स्पर्धेत मिळालेली रक्कम त्यांनी गरीबांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरोक्कोचे खेळाडू ही सर्व रक्कम आपापसात वाटून घेऊन मालामाल झाले असते. परंतु, दर्जेदार फुटबॉलने विश्वचषकात चाहत्यांची मने जिंकणाऱ्या मोरोक्कोने ही रक्कम गरीब लोकांच्या मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पोर्ट्स पेआऊट्सच्या माहितीनुसार मोरोक्कोने फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये सुमारे २.५ मिलियन डॉलर रक्कम बक्षिस मिळाली आहे. त्यासोबतच त्यांना चौथ्या स्थानावर मिळवलेल्या २२ मिलियन डॉलर रक्कम मिळालेली आहे. ही सुध्दा रक्कम संघाने गरीब मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा;