Lionel Messi And Sachin Tendulkar : क्रिकेट आणि फुटबॉलच्या देवाचं असही साम्य.... | पुढारी

Lionel Messi And Sachin Tendulkar : क्रिकेट आणि फुटबॉलच्या देवाचं असही साम्य....

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत हे क्रिकेटप्रेमी राष्ट्र आहे. भारतात हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे पूजला जातो, ज्याचा देव सचिन तेंडुलकरला मानतात. फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीचाही असाच काहीसा दर्जा आहे. भारतासह जगभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. नुकतेच लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२२ सालचा फूटबॉल विश्वचषक जिंकला आहे. (Tendulkar on Messi)

यानंतर लिओनेल मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांची तुलना होऊ लागली. दोघे जरी वेगवेगळे खेळ खेळत असले तरी दोघे त्यांच्या खेळात सर्वोच्च स्थानी पोहचले आहेत आणि दोघांच्या खेळ जीवनात बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आढळत आहे. त्यामुळे मेस्सीची चर्चा सुरु असताना सोबत सचिन तेंडूलकरची सुद्धा जोरदार चर्चा रंगत आहे. खरेतर क्रिकेटच्या माध्यामतून भारत फूटबॉल खेळाशी एकप्रकारे जुळवून घेत असल्याचे यातून निदर्शनास येत आहे.

सध्या लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकीर्दीतील पहिला विश्वचषक जिंकला आहे. याबद्दल सचिन तेंडूलकरनेही मेस्सीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन आणि मेस्सी दोघेही एकाच नंबरची जर्सी घालतात. जर्सीवरील दहा क्रमांक ही दोन्ही महान खेळाडूंची आणखी एक ओळख. आठ वर्षांपूर्वी मेस्सी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध पराभूत झाला होता. तर २००३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केल्याने सचिनचे स्वप्नही भंगले होते. (Tendulkar on Messi)

२०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरला होता. यानंतर त्याने त्या सालचा विश्वचषक जिंकला होता. तसेच, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने १३ डिसेंबर २०२२ रोजी खेळविण्यात आलेल्या क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता.  यानंतर मेस्सीने यंदाच्या फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. हे देखील या दोघांमधील साम्य आहे.

सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंची तुलना केली जात आहे. अशा परिस्थितीत खुद्द सचिनही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्यालाही मेस्सीला विश्वचषक जिंकताना पाहायचे आहे, असे संकेत त्याने एका पोस्टमधून दिले होते. यानंतर सचिनसह प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फूटबॉल विश्वचषकाचा विजय साजरा करत होता. अंतिम फेरीत मेस्सीच्या नावावर एकापाठोपाठ एक अशी विक्रमांची नोंद होत गेली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेज, राऊंड ऑफ १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य सामना आणि फायनलमध्ये गोल करणारा मेस्सी पहिला फुटबॉलपटू ठरला.

त्याने वयाच्या १८ व्या वर्षी विश्वचषकात पहिला गोल केला होता. वयाच्या ३५ व्या वर्षी विश्वचषकात गोल करणारा आणि अस्सिस्ट करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू बनला. अंतिम सामन्या दरम्यान त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० वा गोलही केला.

हेही वाचा;

Back to top button