परभणी : जिंतूर तहसीलमधील 'फोटो मार्फिंग' प्रकरणी चौकशी समिती नेमणार : देवेंद्र फडणवीस | पुढारी

परभणी : जिंतूर तहसीलमधील 'फोटो मार्फिंग' प्रकरणी चौकशी समिती नेमणार : देवेंद्र फडणवीस

जिंतूर : पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तहसील कार्यालयात घडलेले १५ महिला कर्मचाऱ्यांच्या फोटो मार्फिंगचे प्रकरण विधिमंडळात आज (दि.२१) भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्‍यक पोलीस निरीक्षक नरसिंह पोमनाळकर यांना आजच निलंबित करण्यात येत आहे. तर पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांची बदली करण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आमदार मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत या प्रकरणावर अनेक आरोप केले. जिंतूर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यासह पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणी स्वातंत्र्य चौकशी समिती नियुक्त करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील संबंधित दोषींविरोधात तत्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. तक्रार दाखल होऊनही या प्रकरणाकडे कानाडोळा करण्यात आला. आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कानावर हे प्रकरण घातल्यानंतर ‘एलसीबी’ने तपास केला होता. हे प्रकरण सप्टेंबर २०२१ मध्ये घडले होते. या घटनेनंतर १५ महिला कर्मचारी २ महिने कामावर आल्या नव्हत्या. याचे गांभीर्य स्थानिक प्रशासनाला नव्हते, अशी खंत आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा  : 

Back to top button