पिंपरी: ‘ड्रेनेजलाईनची कामे महिनाभरात पूर्ण करू’

पिंपरी: ‘ड्रेनेजलाईनची कामे महिनाभरात पूर्ण करू’

दापोडी (पिंपरी) पुढारी वृत्तसेवा: पावसाळा संपला तरीही ड्रेनेज तुंबलेली दिसून येत आहेत. वारंवार तुंबलेल्या ड्रेनेजची पाहणी करून ही कामे महिनाभरात पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. परिसरातील आत्तार वीटभट्टी, काळूराम काटे चाळ, सरवस्ती अनाथ आश्रम परिसर, गुरव पट्टा, पवार वस्ती येथील ड्रेनेज संदर्भातील समस्या जाणून घेण्यात आल्या. या वेळी नागरिकांनी वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकार्‍यांना सांगितले. ड्रेनेज तुंबल्यानंतर रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेज तुंबलेली प्रत्यक्ष ठिकाणे अधिकार्‍यांना दाखवून तत्काळ काम करण्याच्या सूचना माजी नगरसेवक रोहित काटे यांनी दिल्या.

तक्रार केल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून सारवासारव केली जाते. कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे रहिवाशांना वारंवार तुंबलेल्या गटारीची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यामुळे साथीच्या आजारात वाढ होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून काम मार्गी लावण्याची मागणी सतीश काटे, रुक्ष मुगुटमल आणि करण कणसे यांनी केली आहे.

ठेकेदारांना ड्रेनेजच्या कामाबाबत सांगितले आहे. नवीन पाईपची मागणी केली आहे. परिसरात रस्ते अरुंद असल्याने कामासाठी अडथळा निर्माण होत आहे. दोन महिन्यांत ड्रेनेजचे काम पूर्ण होईल.
– अमोल उंडे, कनिष्ठ अभियंता.

ड्रेनेज तुंबल्यानंतर मैलामिश्रित पाणी रस्त्यावर साचते. याच पाण्यात लहान मुले खेळतात. साचलेल्या पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरते. यामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ होत आहे. प्रशासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
– अतुल गवारी, रहिवाशी.रहिवाशांना वारंवार त्रास

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news