पुढारी ऑनलाईन डेस्क : वनडेमध्ये धमाकेदार व्दिशतकी खेळी करणार्या इशान किशन याने आपल्या पसंतीचे जगातील चार सर्वोत्कृष्ट कर्णधारांची नावे सांगितली आहेत. एका यू-टूयूब चॅनलशी बोलताना त्याने जगातील सर्वात्कृष्ट कर्णधार, फलंदज आणि गोलंदाज यावर आपले मत मांडले आहे. ( Ishan Kishan Top 4 Captains ) विशेष म्हणजे, इशान किशनच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावांचा समावेश नाही. जाणून घेवूया इशान किशनने सर्वोत्कृष्ट कर्णधार आणि खेळाडू म्हणून कोणाला निवडलं आहे याविषयी…
इशान किशनच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये अग्रस्थानी महेंद्रसिंह धोनी आहे. तर दुसर्या व तिसर्या क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रीन स्मिथ आहेत. चौथ्या स्थानी ब्रेंडन मॅक्युलम आहे. इशान किशन याने आपल्या सर्वोत्कृष्ट कर्णधारपदाच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान दिलेले नाही.
जगातील सर्वोत्तम कर्णधारांबरोबच इशानने सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण? या प्रश्नावरही आपलं मत मांडले आहे. इशानच्या मते, विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तर स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन हे दुसर्या व तिसर्या स्थीन आहेत. जो रुट हा चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे इशानने म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे इशानने म्हटलं आहे. दुसर्या व तिसर्या स्थानी अनुक्रमे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स आहेत. तर पाकिस्तानचा शाहीन अफ्रीदी हा चौथ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा याने वनडेमध्ये तीनवेळा व्दिशतकी खेळी केली आहे. ही फलंदाजी चमत्कारच असल्याचे इशान किशनने म्हटलं आहे. आगामी काळात मी माझा फॉर्म अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. इशान किशन याने नुकतेच बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यात सर्वात वेगवान व्दिशतक झळकावून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. त्याने केवळ १२६ चेंडूत व्दिशतक झळकावले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम मोडित काढला होता.
हेही वाचा :