पुढारी ऑनलाईन डेस्क : इशान किशन नावाचा झंझावात आज संपूर्ण क्रिकेट विश्वाने अनुभवला. त्याच्या अविस्मरणीय विश्वविक्रमी खेळीने सारेच आवाक झाले. इशान किशन याने आपल्या 'धुलाई'ने बांगलादेशचे गोलंदाजाची पिसे काढली. त्याने सर्वात वेगवान व्दिशतक झळकविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र या खेळीनंतरत्याने एक खंत व्यक्त केली आहे. ( Ishan Kishan's statement )
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये सलामीवीर इशान किशनने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवत व्दिशतक झळकावले. या सामन्यात इशान किशनने आपले शतक झळकावले. यानंतर त्याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्दिशतक पूर्ण केले. शतक न झळकवता थेट व्दिशतकी खेळी करत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. ख्रिस गेल याने २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध १३८ चेंडूत व्दिशतक झळकावले होते. इशान किशनने केवळ १२६ चेंडूत आपलं व्दिशतक पूर्ण केले. तसेच शतक न झळकवता थेट व्दिशतकी खेळी करणार तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
व्दिशतकी खेळीनंतर बोलताना इशान किशन म्हणाला, " आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अनुकूल होती. मी व्दिशतक झळकावले. मी जेव्हा बाद झालाो तेव्हा १५ षटकांचा खेळ शिल्लक होता. मला ३०० धावा करण्याची संधी होती. मात्र मी बाद झालो. मी ३०० धावा करु शकलो नाही ही खंत कायम राहिल. माझे नाव दिग्गज फलंदाजांच्या यादीत आल्याने मी खूश आहे. "
मी जेव्हा विराटबरोबर फलंदाजी करत होतो तेव्हा विराटभाईने मला कोणत्या गोलंदाजांवर प्रहार करायचे हे सांगितले. मी जेव्हा ९५ धावांवर खेळत होतो तेव्हा षटकार शतक पूर्ण करण्याचा माझा मानस होता. मात्र माझे हे पहिलेच शतक आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करु नकोस, एक-दोन धावा घे, असा सल्ला विराटभाईने दिला होता, असेही इशान किशन याने सांगितले.
हेही वाचा: