FIFA WC : मेस्सी जिंकताच ‘ही’ चाहती झाली टॉपलेस! सर्वांसमोर मर्यादा ओलांडल्या | पुढारी

FIFA WC : मेस्सी जिंकताच ‘ही’ चाहती झाली टॉपलेस! सर्वांसमोर मर्यादा ओलांडल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा विजय साजरा करताना मेस्सीच्या एका महिला चाहतीने भर मैदानात टॉपलेस होत कतारच्या नियमांना धाब्यावर बसवले. लुसेल स्टेडियममध्ये चाहत्यांना चुकीचे वर्तन करण्यास सक्त मनाई असताना, ‘या’ महिलेने टॉपलेस होत अटक होण्याचा धोका पत्करला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, त्यामुळे टॉपलेस होणा-या या अर्जेंटिनाच्या चाहतीला कडक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलच्या निर्णायक किकनंतर एका टीव्ही कॅमेरामनने आपला कॅमेरा स्टेडियममधील चाहत्यांकडे वळवला, या दरम्यान अर्जेंटिनाचे चाहते जल्लोष करताना दिसले. त्याचवेळी एका महिला सर्व मर्यादा ओलांडात आपल्या पार्टनरसह टॉपलेस झाल्याचे समोर आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Image

विश्वचषक स्पर्धेच्या समन्यावेळी चाहत्यांनी स्टेडियममध्ये कशाप्रकारचे कपडे परिधान करावेत याबाबत आयोजक देश कतारने कडक नियमावली तयार केली होती. चाहत्यांना कतारचे कायदे आणि सांस्कृतिक रीतिरिवाजांचे पालन करण्याच्या देण्यात आल्या होत्या. यात मद्य, ड्रग्ज, लैंगिकता आणि ड्रेस कोड या धोरणांचा समावेश होता. इतर देशांतून येणाऱ्या चाहत्यांनी अंगप्रदर्शन होणार नाही असेच कपडे वापण्यास बजावले होते. पण अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सच्या अंतिम सामन्यात असे काही दृश्य पहायला मिळाले ज्याने कतारी कायद्यालाच धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट दिसत आहे. सामना संपल्यानंतर एका अर्जेंटिनाच्या चाहतीने विजयाच्या उन्मादात अंगावरचा टी-शर्ट काढला आणि ती हवेत भिरकावू लागली. तिच्या शेजारी तिचा पार्टनर आणि आजूबाजूला हजारो चाहते यावेळी उपस्थित होते. नेमके हे दृश्य कॅमे-यात कैद झाल्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण झाले. एक स्वप्न जे संपूर्ण जगाने त्याच्यासोबत पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रार्थना केली. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून अर्जेंटिना तब्बल 36 वर्षांनंतर विश्वविजेता ठरला. यापूर्वी 2014 मध्ये मेस्सीने जर्मनीविरुद्धचा सामना गमावून विजेतेपदाची संधी गमावली होती. त्यानंतर आठ वर्षांनी पुन्हा एकदा फायनल गाठून मेस्सीने डिएगो मॅराडोना (1986) नंतर अर्जेंटिनाला जगज्जेता बनवले.

Image

मेस्सी (23व्या मिनिटाला) आणि एंजल डी मारियो (36व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे अर्जेंटिनाने आघाडी घेतली. मात्र एमबाप्पेने 80 व्या आणि 81 व्या मिनिटाला दोन गोल करून सामना अतिरिक्त वेळेत नेला. अतिरिक्त वेळेच्या 108 व्या मिनिटाला मेस्सीने गोल केला, त्यानंतर दहा मिनिटांनी एमबाप्पेने बरोबरी साधत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. शूटआऊटमध्ये, पर्यायी खेळाडू गोन्झालो मॉन्टिएलने निर्णायक पेनल्टीवर गोल केला, तर फ्रान्सच्या किंग्सले कोमन आणि ऑर्लेन चौमेनी हे लक्ष्य चुकले.

Back to top button