पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात रविवारी ( दि. १८) फ्रान्स आणि अर्जेंटिना आमने-सामने आले. जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांनी एका अविस्मरणीय सामन्याचा थरार अनुभवला. अखेर अर्जेंटिना संघाने सामना जिंकत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. यानंतर जगभरात अर्जेंटिना आणि संघाचा मेगास्टार लिओनेल मेस्सीच्या नावाचा गजर सुरु झाला. या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीची पत्नी ( Messi's wife) अँटोनेला रोकुझो हिने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोकुझोने म्हटलं आहे की, "चॅम्पियन्स! मला सुरुवात कशी करावी हेच कळत नाही. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, तुम्हाला शेवटपर्यंत लढावे लागेल, कधीही हार मानायची नाही, हेच तू आम्हाला शिकवलं. याबद्दल तुझे धन्यवाद. मला माहित आहे की, तुम्ही इतके वर्ष काय सहन केले आहे. तुम्हाला काय मिळवायचे होते! आता चला अर्जेंटिनाला जाऊ या."
२०१७ मध्ये मेस्सी आणि रोकुझो यांचा विवाह झाला होता. दोघेही बालपणाचे मित्र-मैत्रीण होते. २००९पर्यंत त्यांनी आपलं नातं जाहीर केले नव्हते. मेस्सी आणि रोकुझो यांना तीन मुले आहेत. मेस्सीचे कुटुंब अंतिम सामन्यावेळी कतारमध्ये उपस्थित होते.
फ्रान्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात मेस्सीने दोन गोल केले. तसेच पेनल्टी शूटआउटमध्येही त्याने आपला करिष्मा दाखवला. तो विश्वचषक स्पर्धेतील सर्वचा सामन्यांमध्ये गोल करणारा जगातील पहिला पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत दुसर्यांदा गोल्डन बॉल पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा :