Argentina vs France final : मेस्‍सीबाबत सुपर कॉम्‍पुटरची भविष्‍यवाणी खरी ठरणार !… तर ‘हा’ संघ ठरेल फुटबॉल जगज्‍जेता

Argentina vs France final : मेस्‍सीबाबत सुपर कॉम्‍पुटरची भविष्‍यवाणी खरी ठरणार !… तर ‘हा’ संघ ठरेल फुटबॉल जगज्‍जेता

पुढारी ऑनलाईन : कतारमध्ये २० नोव्‍हेंबर 2022 पासून फुटबॉल विश्वचषक स्‍पर्धेला प्रारंभ झाला. २० नोव्‍हेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण जगाने उत्‍कृष्‍ट फुटबॉलचा आनंद लुटला. ३२ संघ सहभागी झालेल्‍या स्‍पर्धेत अनेक चढउतार आले. आता स्‍पर्धेत सर्वोच्‍च क्षण समीप येवून ठेपला आहे.  आज अर्जेंटिना आणि फ्रान्‍स संघात अंतिम सामना होणार आहे. (  Argentina vs France final ) अंतिम सामन्‍यात कोणता संघ बाजी मारणार यावर फुटबॉल प्रेमींमध्‍ये खल सुरु आहे. मात्र तुम्‍हाला माहित आहे का, ही स्‍पर्धा सुरु होण्‍यापूर्वीच सुपर कॉम्‍पुटरने फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत कोणता संघ बाजी मारणार याचे भाकित  केले होते. जाणून घेवूया याविषयी…

 Argentina vs France final : मेस्‍सीबाबत केलेली भविष्‍यवाणी खरी ठरणार?

उपलब्‍ध डाटाच्‍या आधारे सुपर कॉम्‍पुटरने भविष्‍यवाणी केली होती की,  "यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत अर्जेटिना संघ अंतिम सामन्‍यात धडक मारेल. अंतिम सामन्‍याच्‍या महामुकाबल्‍यात अर्जेंटीनाचा संघ विजयी होईल आणि  विश्‍वविजेता बनेल. आपला अखेरचा विश्‍वचषक (Super Computer Prediction) खेळणारा फुटबॉलपटू मेस्‍सी हा अर्जेंटिना संघाला विश्‍वविजेता बनवेल."

 Argentina vs France final : सुपर कॉम्‍पुटरचे एक भाकित चुकलेच…

कॉम्‍पुटरने भाकित केले होते की, "यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत अर्जेटिना आणि पोर्तुगाल हे संघ फायनलमध्‍ये धडक मारतील. मात्र हे भाकित चुकले आहे. मोरोक्को संघाने उपांत्यपूर्व फेरीत रोनाल्डोच्या बलाढ्य पोर्तुगाल संघाचा पराभव केला. हा सामना  १-० अशा फरकाने जिंकत मोरोक्कोने दिमाखात उपांत्‍य फेरीत धडक मारली होती. उपांत्‍यपूर्व फेरीतच पार्तुगालचा संघ स्‍पर्धेतून बाद झाल्‍याने सुपर कॉम्‍पुटरचे अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांच्‍यात अंतिम सामना होईल हे भाकित चुकले आहे.  तसेच यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत इंग्‍लंडचा संघ हा सेमीफायनला पोहचेल. हेही भाकित खोटे ठरले आहे.

फ्रान्‍सबाबतची भविष्‍यवाणीही सेमीफायनलपर्यंतच बरोबर

२०१८ मधील विश्‍वविजेता फ्रान्‍सच्‍या संघ यंदा सेमीफायनलपर्यंत धडक मारेल, अशी भविष्‍यावाणी सुपर कॉम्‍पुटरने केली होती. तसेच सेमीफायनलमध्‍ये फ्रान्‍सचा मुकाबला अर्जेटिना संघाशी होईल. या सामन्‍यात अर्जेटिना विजयी होत अंतिम फेरीत धडक मारेल, असेही भाकित सुपर कॉम्‍पुटरने केले होते. अर्जेटिना फायनलमध्‍ये धडक मारणार हे भाकित खरे ठरले असले तरी फ्रान्‍स संघाचा पराभव होईल ही भविष्‍यवाणी चुकलीच आहे. आता फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या फायनलसाठी अवघे काही तास राहिले आहेत. सुपर कॉम्‍पुटरची भविष्‍यावणी खरी ठरली तर अर्जेंटिना संघ हा फुटबॉल जगज्‍जेता ठरेल. आही भविष्‍यवाणी खरी ठरणार की, फ्रान्‍सचा संघ आपली दमदार कामगिरी कायम ठेवत सलग दुसर्‍यांदा विश्‍वचषकावर आपली मोहर उमटविणार, हे पुढील काही तासांमध्‍येच स्‍पष्‍ट होणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news