FIFA World Cup : मोरोक्कोशी आहे भारताचे खास नाते | पुढारी

FIFA World Cup : मोरोक्कोशी आहे भारताचे खास नाते

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात दि. १८ डिसेंबरला होणार आहे. मात्र, त्याआधी आज (दि. १७ ) मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी सामना होणार आहे. मोरोक्कोला जेतेपदापासून वंचित राहावे लागले असले तरी मोरोक्कोला इतिहास रचण्याची संधी आहे. विशेष बाब म्हणजे या फिफा विश्वचषकात आशियातील अनेक देशांसोबत भारताकडून मोरोक्कोला पाठिंबा मिळाला होता. ज्याची अनेक कारणे आहेत. (FIFA World Cup)

मोरोक्कोचा भारताशी स्नेह

मोरोक्कोचा भारताशी जुना संबंध आहे. मोरोक्को हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला २ मार्च १९५६ रोजी स्वातंत्र्य मिळाले. अरब प्रवासी इब्न बतुता भारतात आल्याने मोरोक्को आणि भारत यांच्यातील संबंध दृढ झाले. भारताने संयुक्त राष्ट्रात मोरोक्कोच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतल्याने मोरोक्कोशी संबंध अधिक चांगले झाले. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये मोरोक्कोला पाठिंबा दिला आणि २० जून १९५६ रोजी फ्रान्ससोबतच्या संरक्षणवादी व्यवस्थेतून देश मुक्त झाला. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि मोरोक्को यांच्यातील संबंध चांगले आहेत. (FIFA World Cup)

अंतिम चारमध्ये पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ

या फुटबॉल विश्वचषकात मोरोक्कोने अप्रतिम कामगिरी केली. उपांत्य फेरीत त्यांचा फ्रान्सकडून पराभव झाला असला तरीविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. मोरोक्कोने फिफा विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीसाठी मोरोक्कोला जगभरातील देशांचा पाठिंबा मिळाला. यासह भारताच्या फुटबॉलप्रेमींनीही मोरोक्कोला भरभरून पाठिंबा दिला. तिसर्‍या स्थानासाठीच्या सामन्यात मोरोक्कोलाही जबरदस्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.

मोरोक्को आणि भारत यांच्यातील व्यापार

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारत आणि मोरोक्को यांच्यातील व्यापार वाढत आहे, १९९९ मध्ये, मोरोक्कोमध्ये खताच्या व्यापाराला चालना देण्यासाठी IMACID नावाचा भारत-मोरोक्को यांच्यात संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आला होता. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले. या करारांतर्गत दोन्ही देशांतील अनेक कंपन्यांमध्ये व्यापार होतो.

याशिवाय विशेष बाब म्हणजे मोरोक्कोमध्येही अनेक भारतीय राहतात. अशा परिस्थितीत भारताच्या फुटबॉलप्रेमींनी फुटबॉल विश्वचषकात मोरोक्कोला साथ दिली. फुटबॉलमध्ये आतापर्यंत युरोपियन देशांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, मोरोक्कोने उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे आफ्रिकेतील तसेच आशियातील बहुतेक देशांनी मोरोक्कोला पाठिंबा दिला. मोरोक्कोच्या सामन्यांदरम्यान बहुतेक चाहते संघाची जर्सी समर्थन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली.

विश्वचषकातील मोरोक्कोचा प्रवास

यंदाचा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोसाठी खूप खास ठरला आहे. कारण, मोरोक्कोने उपांत्य फेरीत धडक मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. जरी त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, झाले असले तरी जर मोरोक्कोने तिसरे स्थान पटकावले तर ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी असणार आहे.

मोरोक्कोने त्यांचा पहिला सामना क्रोएशियाविरुद्ध खेळला, जो गोलशून्य बरोबरीत संपला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी बेल्जियमचा २-० असा पराभव केला. तिसर्‍या सामन्यात कॅनडाचा २-१ असा पराभव झाला, तर मोरोक्कोने राऊंड ऑफ १६ फेरीत स्पेनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा १-० ने असा पराभव करून मोरोक्कोने प्रथमच उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला पराभूत करून मोरोक्कोने स्पर्धेतून बाहेर फेकल्याने रोनाल्डोला अश्रू अनावर झाले. त्यांना उपांत्य फेरीत फ्रान्सने नॉकआउट केले.मोरोक्कोकडून २-० असा पराभव पत्करावा लागला होता. आता तिसऱ्या स्थानासाठी आज मोरोक्कोचा सामना क्रोएशियाशी होणार आहे.

हेही वाचा;

Back to top button