Maharashtra Kesari Wrestling Tournament : कुस्तीगिरांच्या ‘दिलजमाई’त शरद पवारांचा पुढाकार

Maharashtra Kesari Wrestling Tournament : कुस्तीगिरांच्या ‘दिलजमाई’त शरद पवारांचा पुढाकार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Kesari Wrestling Tournament : 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे का नगर भरवायची याबाबत दोन्ही गटातील आयोजकांनी आपला हक्क दाखवला होता. एकाच राज्यात दोन महाराष्ट्र केसरी होणार का याबाबत मल्लांमध्येही संभ्रमावस्था होती. परंतु, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन खासदार बृजभूषण सिंह यांच्याची चर्चा करून पुण्याला स्पर्धेच्या आयोजनाचा मान दिला.

Maharashtra Kesari Wrestling Tournament : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केली. याविरोधात परिषदेचे सचिव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर दुसर्‍या बाजूला महासंघाने अस्थायी समितीची स्थापना केली. या समितीने त्यांच्या अधिकारात निवडणूकही घेतली. मात्र, या निवडणुकीला स्थगिती आल्याने पुन्हा कारभार अस्थायी समितीकडेच आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा अधिकार कोणत्याही गटावर यावरून श्रेयवाद सुरू झाले.

Maharashtra Kesari Wrestling Tournament : या सर्व वादावर पडदा टाकण्यासाठी पुण्यातून अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके आणि सह्याद्री कुस्ती संकुलाचे विजय बराटे यांनी खासदार शरद पवार यांनाच साकडे घातले. पवार यांनीही मल्लांच्या भविष्याचा विचार करून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार बृजभूषण सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेनंतर 'दिलजमाई' झाली आणि 2022 ची महाराष्ट्र केसरी पुण्याला तर 2023 ची स्पर्धा नगरला घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला. मल्लांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर करण्यात पुण्यातील कुस्तीसाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना अखेर यश आले, असेच म्हणावे लागेल.

Maharashtra Kesari Wrestling Tournament : कुस्ती परिषदेचा निर्णय महाराष्ट्र केसरीनंतरच

2022 या वर्षातील 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार असून ही स्पर्धा परिषदेच्या अस्थायी समितीच्या अधितपत्याखालीच होणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर कुस्तीगीर परिषदेबाबत विचारविनिमय होणार असून यापूर्वी झालेली परिषदेचे निवडणुकीचा निकाल कायम ठेवायचा का की पुन्हा निवडणूक घ्यायची याबाबत निर्णय होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news