रोनाल्‍डोची भविष्यवाणी, मेस्‍सी नाही तर ‘हा’ संघ जिंकणार वर्ल्ड कप!

Ronaldo
Ronaldo

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धा आता अंतिम टप्‍प्‍यात पोहचली आहे. आजपासून स्‍पर्धेतील उपांत्य सामने सुरू होतील. दरम्यान, स्पर्धेच्या उपांत्‍यपूर्व फेरीतून अनेक दिग्गज संघांना बाहेर पडावे लागले आहे. यात ख्रिस्तियानो रोनाल्‍डोच्या पोर्तुगालचाही समावेश आहे. याचबरोबर पोर्तुगालला विश्वविजेता बनविण्‍याचे रोनाल्डोचे स्‍वप्‍न पुन्हा भंगले आहे. आता वर्ल्ड कपच्या टॉफीवर कोणता देश मोहर उमटविणारा, यावर त्याने भविष्यवाणी केली आहे. रोनल्डोने मेस्‍सीचा अर्जेटिना संघ विश्‍वचषक जिंकणार नाही, असे भाकित अप्रत्‍यक्षपणे केले आहे. ( FIFA World Cup and Ronaldo)

विश्वचषक स्‍पर्धेच्या उपांत्‍य फेरीत अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्‍स आणि मोरोक्को या चार संघांनी धडक मारली आहे. आज (दि. 13) अर्जेंटिना-क्रोएशिया आमने-सामने येणार आहेत. या सामन्याविषयी स्‍टार फुटबॉलपटू रोनाल्डोने माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, ब्राझील किंवा फ्रान्‍सचा संघ विश्वचषक जिंकतील, असे मला स्‍पर्धेच्‍या सुरुवातीला वाटत होते. मात्र ब्राझीलचा संघ उपांत्यपूर्व फेरीत बाद झाला आहे. आता माझ्‍या मते फ्रान्‍स हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. आजही माझी फेव्हरिट टीम फ्रान्‍स आहे,' असे त्याने म्हटले आहे.

उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सने इंग्लंडला पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. आता या संघाची लढत मोरक्कोशी होईल. मोरक्‍को हा उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन देश आहे. याबाबत रोनाल्डो म्हणाला, 'आफ्रिकन संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणे ही एक फुटबॉलच्‍या इतिहासातील महान गोष्‍ठ ठरली आहे. फुटबॉल आम्हाला जे देतो ते खूपच मौल्‍यवान आहे,' अशी भावना त्याने व्यक्त केली.

लुसेल स्टेडियमवर आज (दि. 13) उपांत्य फेरीत अर्जेंटिनाची लढत क्रोएशियाशी होईल, तर 15 डिसेंबर रोजी फ्रान्सची लढत अल ब्याट स्टेडियमवर मोरोक्कोशी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news