पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA Ban Messi : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आपल्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे, परंतु दोन दशकांच्या कारकिर्दीत तो आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकून देऊ शकलेला नाही. यंदा त्याच्याकडे हे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी आहे कारण त्याचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, मेस्सीशिवाय अर्जेंटिनासाठी उपांत्य फेरीतील आव्हान सोपे नसेल हेही तितकेच खरे आहे. अशातच मेस्सीच्या संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली असून तो उपांत्य फेरीचा सामना खेळणार की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
दोन गोलची आघाडी गमावल्यानंतर अर्जेंटिनाने शुक्रवारी पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 असा पराभव करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. दरम्यान, दुस-या एका उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलवर विजय मिळवून मोठा उलटफेर करणा-या क्रोएशियन संघाशी मेस्सीचा संघ भिडणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात मेस्सी खेळणार की नाही हे ठरलेले नाही कारण फिफा त्याच्यावर बंदी घालण्याची चर्चा सध्या जागतिक फुटबॉल जगतात सुरू आहे. (FIFA Ban Messi fifa could take major action against argentina captain lionel messi)
फिफाने आपल्या शिस्तभंगाच्या संहितेत सामन्यांतील आदेश आणि सुरक्षा नियमांचा उल्लेख करत अर्जेंटिना फुटबॉल महासंघाविरुद्ध आरोप गंभीर आरोप केले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचे बदली खेळाडू आणि प्रशिक्षक मैदानात आले, ज्यामुळे अखेरच्या क्षणी सामन्यात राडा झाला. निर्धारीत आणि अतिरिक्त वेळेत 2-2 अशा गोल बरोबरीनंतर अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकला, पण त्यानंतरही दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. एका सामन्यात पाच पिवळे कार्ड मिळाल्यानंतर, संघावर गैरवर्तनाचे आरोप नित्याचेच आहेत तथा अर्जेंटिना आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. असेही फिफाने सांगितले आहे. दरम्यान, स्पर्धेत सांघिक गैरवर्तनासाठी फिफाच्या शिस्तपालन समितीकडून अर्जेंटिना आणि नेदरलँड या दोन्ही संघांच्या फेडरेशनला 15,000 स्विस फ्रँक ($16,000) दंड ठोठावण्यात येऊ शकतो. या आधी सौदी अरेबिया संघावर अशाच प्रकारे दोनदा कारवाई करण्यात आली होती. (FIFA Ban Messi fifa could take major action against argentina captain lionel messi)
अर्जेंटिनाचा संघ दोषी आढळल्यास त्यांचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे त्याच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मेस्सी हा त्याच्या संघाचा स्टार खेळाडू आहे. एकप्रकारे ही संपूर्ण टीम त्याच्यावर अवलंबून आहे. मेस्सीशिवाय उपांत्य फेरीचा अडथळा पार करणे अर्जेंटिना संघासाठी सोपे नसेल. मेस्सीचा हा पाचवा आणि शेवटचा विश्वचषक आहे. अशा परिस्थितीत त्याचे 20 वर्षांचे स्वप्न अधुरे राहू नये अशी चाहते प्रार्थना करत आहेत. (FIFA Ban Messi fifa could take major action against argentina captain lionel messi)