FIFA WC 2022 : सेनेगेलवर एकतर्फी विजय मिळवत इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल; ३-० ने विजय | पुढारी

FIFA WC 2022 : सेनेगेलवर एकतर्फी विजय मिळवत इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल; ३-० ने विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA WC 2022) उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने आपले स्थान पक्के केले आहे. त्यांनी रविवारी (४ डिसेंबर) राऊंड ऑफ १६ फेरीत सेनेगलचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार हॅरी केन, जॉर्डन हेंडरसन आणि बुकायो साका यांनी प्रत्येकी एक गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना गतविजेत्या फ्रान्सशी होणार आहे. फ्रान्सने  राऊंड ऑफ १६ सामन्यात पोलंडचा ३-१ असा पराभव केला.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने सेनेगल वर अनेक चढाया केल्या परंतु सेनेगलच्या बचावपटूंनी केलेल्या चांगल्या बचावामुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या ३८ व्या मिनिटला इंग्लंडचा खेळाडू बेलिंगहॅमच्या पासवर सेनेगलवर जॉर्डन हेंडरसनने गोल करत सामन्यात संघाला  आघाडी मिळवून दिली. त्याच्यापाठोपाठ कर्णधार हॅरी केन याने हाफ टाईमच्या आधी फिल फोडेनच्या पासवर केनने इंन्जुरी टाईममध्ये (४५+३) गोल करत संघाची आघाडी भक्कम केली. या विश्वचषकातील हॅरी केनचा हा पहिलाच गोल आहे. (FIFA WC 2022)

सामन्याच्या दुसऱ्यामध्ये बुकायो साकाने इंग्लंडसाठी सामन्यातील तिसरा गोल केला. त्याने ५७व्या मिनिटाला बॉलला सेनेगलच्या गोलपोस्टची दिशा दाखवली. या फुटबॉल विश्वचषकातील साकाचा हा तिसरा गोल आहे. या सामन्यात सेनेगलला एकही गोल करण्यात यश आले नाही त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले. त्यांनी इंग्लंडच्या गोलपोस्टवर एकूण १० शॉट मारले त्यापैकी फक्त एक शॉट ऑन टार्गेट होता. संपूर्ण सामन्यात बॉलवर ६२ टक्के ताबा हा इंग्लड संघाचा होता. आक्रमणे करून ही गोल करण्यात यश न आल्यामुळे सेनेगलचा इंग्लंडने एकतर्फी ३-० अशा गोल फराकाने पराभव केला. सेनेगलविरूध्दच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना गतविजेत्या फ्रान्सशी होणार आहे. हा सामना ११ डिसेंबर रोजी रात्री १२.३० होणार आहे.

हेही वाचा;

Back to top button