FIFA WC 2022 : पोलंडला पराभूत करत फ्रान्सची उपात्यंपूर्व फेरीत धडक; एमबाप्पेचा विक्रम | पुढारी

FIFA WC 2022 : पोलंडला पराभूत करत फ्रान्सची उपात्यंपूर्व फेरीत धडक; एमबाप्पेचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने पोलंडचा ३-१ अशा गोल फरकाने पराभव केला. सामन्यात फ्रान्सचा युवा खेळाडू किलियन एमबाप्पेने दोन गोल केले. तर, अनुभवी ऑलिव्हियर गिरूडने एक गोल केला. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात फ्रान्सने नवव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर, पोलंडचे १९८२ नंतर उपांत्यपूर्व फेरी पोहचण्याचे स्वप्न भंगले. या सामन्यात पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने पेनल्टीवर एकमेव गोल केला. (FIFA WC 2022)

सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी (FIFA WC 2022) सावध भूमिका घेत चढाया रचण्याच्या प्रयत्न केला. या सावध खेळी करत दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलपोस्टवर सतत आक्रमण करत राहिले. २९ व्या मिनिटाला विरोधी संघातील खेळाडू फ्रँकोव्स्कीच्या चुकीचा फायदा फ्रान्सने घेता आला नाही. त्यावेळी अँटोनी ग्रीझमनने डेम्बेलेला उत्कृष्ट पास दिला. या पासवर डेम्बेले बॉल घेऊन नेदरलँडच्या गोलपोस्टच्या दिशेने चढाई केली, पुढे ऑलिव्हियर गिरूडला गोल करण्याची सोपी संधी होती. परंतु त्याला गोल करण्यात यश आले नाही.

गिरूड ठरला फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

किलियन एमबाप्पेने दिलेल्या पासवर गिरूडने ४४व्या मिनिटाला फ्रान्ससाठी सामन्यातील पहिला गोल केला. या गोलसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. गिरूड हा फ्रान्ससाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याने थियरी हेन्रीच्या ५१ गोलना मागे टाकले.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये पोलंडच्या खेळाडूंनी फ्रान्सची आघाडी कमी करण्यासाठी त्यांच्य़ा गोलपोस्टवर अनेक आक्रमणे केली. परंतु, फ्रान्सच्या बचावपटूंनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना आघाडी कमी करता आला नाही. किलियन एमबाप्पेने ७४ व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला दुसरी आघाडी मिळवून दिली. गिरूडच्या पासवर डेम्बेलेने बॉल एमबाप्पेला दिला. एमबाप्पेचा या विश्वचषकातील चौथा गोल आहे. स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत तो लिओनेल मेस्सीच्या (तीन) पुढे गेला आहे. त्याचवेळी, एम्बाप्पेचा विश्वचषक इतिहासातील हा आठवा गोल आहे. तो २४ वर्षाखालील आठ गोल करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकले. पेलेचे २४ वर्षे होते तेव्हा त्यांनी त्यांनी फुटूबॉल विश्वचषक स्पर्धेत सात गोल केले होते.

पोलंडसाठी एकमेव गोल रॉबर्ट लेवांडोस्कीने केला. त्याला सामन्याच्या शेवटी पेनल्टीवर गोल करण्याची संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी ठरला, पण फ्रेंच खेळाडूंच्या चुकीमुळे रेफ्रींनी त्याला पुन्हा पेनल्टी घेण्यास सांगितले. यावेळी लेवांडोस्कीने कोणतीही चूक न करता संघासाठी एकमेव गोल केला. संपूर्ण सामन्यात रॉबर्ट लेवांडोस्की छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे सामन्यात फ्रान्सने पोलंडचा ३-१ अशा गोल फराकाने पराभव करत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एमबाप्पेचा अनोखा विक्रम

सामन्यात गोल करताच फ्रान्सचा युवा खेळाडू अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एमबाप्पने या फुटब़ॉल विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत त्याने ४ गोल केले आहेत. विश्वतचषक स्पर्धेत त्याने आत्तापर्यंत ८ गोल केले आहेत. त्याने २४ वर्षापेक्षा कमी वयात ८ गोलकरून त्याने ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांना मागे टाकले आहे. पेलेचे २४ वर्षे होते तेव्हा त्यांनी फुटूबॉल विश्वचषक स्पर्धेत सात गोल केले होते.

हेही वाचा;

Back to top button