Shakib al Hasan Record : भारतविरुद्धच्या वनडेत शाकिबची ‘विक्रमी’ कामगिरी | पुढारी

Shakib al Hasan Record : भारतविरुद्धच्या वनडेत शाकिबची 'विक्रमी' कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्‍या अखेरच्‍या जोडीने भारताचा विजयाचा घास हिरावला. या जोडीने केलेल्‍या ५१ धावांच्‍या भागीदारामुळे बांगलादेशने भारताचा १ गडी राखून पराभव केला. या सामन्यात बांगलादेशचा ऑलराऊंडर खेळाडू शाकिब अल् हसन याने (Shakib al Hasan Record)  नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. जाणून घेऊया  ‘या’ विक्रमाबद्दल…

पहिल्‍या वनडे सामन्‍यात फिरकीपटू शाकिब याने तब्बल ५ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने केलेल्या या शानदार गोलंदाजीमुळे भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला गेला. या वेळी शाकिबने भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर अशा महत्त्वाच्या खेळाडूंना बाद केले. (Shakib al Hasan Record)

या कामगिरीसह शाकिबने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी बाद करणारा पहिला बांगलादेशी फिरकीपटू ठरला आहे. तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध ५ गडी बाद करणारा तो आठवा फिरकिपटू ठरला आहे. या कामगिरीमुळे एका खास यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. या यादीमध्ये त्याच्यासमवेत मुश्ताक अहमद, सकलेन मुश्ताक, मुथय्या मुरलीथरन, ऍशले जाइल्स, अजंथा मेंडिस, सईद अजमल आणि अकिला धनंजया या फिरकीपटूंचा समावेश आहे. या फिरकीपटूंनी भारतविरूध्दच्या सामन्यात ५ गडी बाद करण्याच्या विक्रम केला होता. आता या यादीत शाकीबचाही समावेश झाला आहे.

हेही वाचा;

Back to top button