Dwayne Bravo : ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून निवृत्ती; सीएकेने सोपावली मोठी जबाबदारी

कॅरेबियन अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी ब्राव्होला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांने हा निर्णय घेतला. आता ड्वेन ब्राव्हो आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या बॉलिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीपती बालाजीने आगामी सीझनसाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. (Dwayne Bravo)
ड्वेन ब्राव्हो म्हणाला, ‘मी या नवीन प्रवासाची वाट पाहत होतो, कारण माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या समाप्तीनंतर मी स्वतःला नवीन काही करण्यासाठी उत्सुक होतो. मला गोलंदाजांसोबत काम करायला मजा येते आणि ही भूमिका मला खूप आवडली आहे. ही भूमिका पार पाडण्यात मला काही अडचण येईल असे वाटत नाही.
ब्राव्हो म्हणाला, ‘जेव्हा मी खेळत असतो, तेव्हा मी नेहमी गोलंदाजांसोबत काम करतो आणि फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी योजना आणि कल्पना मांडण्याचा प्रयत्न करत असतो. फरक एवढाच आहे की मी यापुढे मिडॉन किंवा मिडऑफवर उभा राहणार नाही. मी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेन असे मला कधीच वाटले नव्हते पण आयपीएलच्या इतिहासाचा भाग झाल्याचा मला आनंद आहे.
२०१७ साली झालेल्या आयपीएल हंगाम वगळता ब्राव्होने प्रत्येक वर्षी आयपीएलमध्ये भाग घेतला आहे. २००८ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा करारबद्ध केले होते. तीन हंगाम तो मुंबईसोबत राहिला होता. यानंतर २०११ च्या लिलावात सीएसकेने ब्राव्होला त्यांच्या संघात समाविष्ट केले. २०१६ साली सीएकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी त्याला गुजरात लायन्सने आपल्या संघात घेतले होते.२०१८ साली सीएकेवरील बंदी हटवल्यानंतर सीएकेने पुन्हा ब्राव्होला आपल्या संघात स्थान दिले. २०२२ सालच्या आयपीएल हंगामापर्यंत तो सीएके संघाचा भाग राहिला.
Bowling Boots 🆙
Coach Cap 🔛Yours Yellovely, #SirChampion @DJBravo47 💛 pic.twitter.com/GkH2aDRkJ4
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 2, 2022
हेही वाचा;
- Romelu Lukaku : लुकाकूकडून डगआउटची तोडफोड; विश्वचषकातून बाहेर पडल्याने अश्रूअनावर
- Maharashtra- Karnataka border dispute | महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा इशारा