Hardik Pandya dance : हार्दिक पंड्या घेतोय पत्‍नीकडून डान्‍स टीप्‍स, फॅन्‍स म्‍हणाले, " तू चंपक चाचा सारख.." ( व्हिडीओ ) | पुढारी

Hardik Pandya dance : हार्दिक पंड्या घेतोय पत्‍नीकडून डान्‍स टीप्‍स, फॅन्‍स म्‍हणाले, " तू चंपक चाचा सारख.." ( व्हिडीओ )

पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्‍या व्हायरल होत आहे. यामध्ये हार्दिक पत्नीकडून डान्स शिकताना दिसत आहे. यावर चाहते खूप मजेशीर कमेंट करत आहेत. हार्दिक पंड्याअसा खेळाडू आहे की, तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याची बॅट स्वतःच बोलते. दमदार शॉट्स खेळण्यासाठी तो ओळखला जातो. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यामध्‍ये आहे. अलीकडेच हार्दिक पांड्याने (Hardik Pandya dance) त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्‍हिडीओमध्‍ये तो पत्नी नताशा स्टॅनकोविककडून डान्स शिकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मैदानात खेळाडूंना बॅट आणि बॉलने डान्स करायला लावणाऱ्या हार्दिकसाठी हा सराव सोपा नसल्‍याचे दिसतय. चाहत्यांनी यावर व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका चाहत्याने तर त्याची तुलना तारक मेहता का उलटा चष्मा कार्यक्रमातील चंपक चाचाशी केली आहे. (Hardik Pandya dance)

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की, ‘डान्सचे धडे इथूनच मिळतात.’ त्याच्या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. हार्दिकला स्टेप्स कॉपी करताना खूप अडचण येत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘पंड्या चंपक चाचासारखा नाचतोय’. हार्दिक पंड्याला बॉलिवूड चित्रपटात बघायचे आहे, अशी प्रतिक्रिया काही चाहत्‍यांनी दिली आहे.

हेही वाचा;

Back to top button