FIFA WC 2022 : कोस्टारिकाकडून जपान १-० ने पराभूत | पुढारी

FIFA WC 2022 : कोस्टारिकाकडून जपान १-० ने पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव करणाऱ्या जपानला कोस्टारिकाने १-० ने पराभूत केले. जपान पराभूत झाल्‍याने ग्रुप E मधील समीकरणे बदलली आहे.  आज रात्री होणाऱ्या जर्मनी विरूध्द स्पेन सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. स्पर्धेतील आपले आव्हान टिकवण्यासाठी जर्मनीला स्पेनवर विजय मिळवणे महत्वाचे आहे. (FIFA WC 2022)

जपान विरुद्‍ध कोस्टारिका सामन्यात ८१ व्या मिनिटाला कोस्टारिकाचा कीशर फुलर याने बॉलला गोलची दिशा दाखवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. सामन्याच्या संपूर्ण अनेक प्रयत्न करून जपानला सामन्यात एकही गोल करता आला नाही. त्यामुळे कीशर फुलरने केलेल्या एकमेव गोलमुळे कोस्टारिकाने जपानचा १-० अशा गोल फरकाने विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. आता या ग्रुपमधील  जर्मनी विरूध्द स्पेन सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधले आहे. आज रात्री साडेबारा वाजता हा सामना होणारा आहे.

हेही वाचा;

Back to top button