FIFA WC 2022 : इंग्लंड – वेल्सच्या चाहत्यांचा कतारच्या रस्त्यावर ‘राडा’ ( व्हिडीओ ) | पुढारी

FIFA WC 2022 : इंग्लंड - वेल्सच्या चाहत्यांचा कतारच्या रस्त्यावर 'राडा' ( व्हिडीओ )

पुढारी ऑनलाईन डेस्क :   कतार येथे सुरू असलेली फुटबॉल विश्वचषक (FIFA WC 2022) स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  कतारमधील कडक नियमांमुळे स्पर्धा चर्चेत आली. त्यानंतर या-ना त्या कारणाने कतारमध्ये सुरू असलेला फुटबॉल विश्वचषक चर्चेत येत आहेत. सध्या इंग्लंडचे चाहते चर्चेचा विषय ठरले आहेत. पहिल्यांदा इंग्लंडच्या चाहत्यांनी कपड्यांबाबतचे कतारमधील नियम तोडले होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता इंग्लंड आणि वेल्सच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यादरम्यान चाहत्यांनी एकमेकाला जोरदार लाथा-बुक्क्या मारल्या. चाहत्यांनी एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंग्लंडचे चाहते सामन्यांदरम्यान त्यांच्या आक्रमक वृत्तीसाठी कुप्रसिद्ध आहेत. याआधीही फुटबॉल सामन्यांदरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी विरोधी संघाच्या समर्थकांशी आणि पोलिसांशीही हाणामारी केली. याच कारणावरून नवा वाद समोर आल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तथापि, फिफा विश्वचषक २०२२ मधील हा पहिलाच वाद नाही. यापूर्वी मेक्सिकोच्या चाहत्यांनी मेस्सीला शिवीगाळ केली होती आणि मेस्सीच्या चाहत्यांनी त्यांनाजोरदार मारहाण केली होती. (FIFA WC 2022)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये इंग्लंडचे प्रेक्षक मद्यधुंद अवस्थेत दिसत आहेत. ते वेल्सच्या समर्थकांशी लढताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एकमेकांची खुर्ची, हातातल्या बाटलीने राडा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शुक्रवार,  २५  नोव्‍हेंबरचा आहे. याच दिवशी इंग्लंडच्‍या संघाने त्यांचा दुसरा सामना खेळला होता. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात एकाही संघाला गोल करता आला नाही.

इंग्लंडने या स्पर्धेतील पहिला सामना इराणविरुद्ध ६-२ अशा फरकाने जिंकला. हा संघ अमेरिकेसोबतचा दुसरा सामना अनिर्णित ठेवून उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. विशेष म्हणजे इंग्लंडला आपला तिसरा सामना फक्त वेल्सविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांचे चाहते पुन्हा एकदा आमने-सामने येतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा;

Back to top button