FIFA WC Tunisia vs Australia : ऑस्ट्रेलियाने ट्युनिशियावर १-० ने केली मात

FIFA WC Tunisia vs Australia : ऑस्ट्रेलियाने ट्युनिशियावर १-० ने केली मात
Published on
Updated on

दोहा; पुढारी वृत्तसेवा : फुटबॉल वर्ल्ड कपच्या सातव्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. त्याने गट-ड मध्ये ट्युनिशियाचा 1-0 असा पराभव केला. या विजयासह त्यांचे आतापर्यंत दोन सामन्यांत तीन गुण झाले आहेत. तो अजूनही प्री-क्वार्टर फायनल गाठण्याचा दावेदार आहे. ट्युनिशियाचा मागील सामना डेन्मार्कसोबत बरोबरीत सुटला होता. पुढील शर्यतीत जाण्यासाठी तो सुद्धा दावेदार आहे. सहाव्यांदा विश्वचषकात सहभाग नोंदविणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २०१० नंतर वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे. (FIFA WC Tunisia vs Australia)

कतार विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. त्याने गट-ड मध्ये ट्युनिशियाच्या संघाचा 1-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल ड्यूकने या सामन्यातील एकमेव गोल केला. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच गोल ठरला. (FIFA WC Tunisia vs Australia)

ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वचषकात खेळत आहे. त्याला 17 सामन्यांत केवळ दोन विजय मिळाले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले असून 11 वेळा कांगारू संघ पराभूत झाला आहे. त्याने 2006 मध्ये जपान आणि 2010 मध्ये सर्बियाचा पराभव केला होता. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती. विश्वचषकातील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी होती.


अधिक वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news