FIFA WC Portugal vs Ghana : चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालचा घानावर विजय; रोनाल्डोचा विश्वविक्रम | पुढारी

FIFA WC Portugal vs Ghana : चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालचा घानावर विजय; रोनाल्डोचा विश्वविक्रम

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामान्यात पोर्तुगालने घानाचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. घानाने पोर्तुगालाल कडवी झुंज दिली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा संघर्ष सुरु होता. पण, अखेर पोर्तुगालने विजयी आघाडी घेतली. फिफा विश्वचषकातील ग्रुप एच मधील सामना पोर्तुगाल आणि घाणा दरम्यान खेळवला गेला. या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये पेनल्टीवर गोल करत ख्रिस्टीयानो रोनाल्डो याने पाच विश्वचषकात गोल नोंदविण्याची विश्वविक्रमी कामगिरी बजावली. (FIFA WC Portugal vs Ghana)

खेळ सुरु झाल्यावर पहिल्या हाफ पर्यंत कोणत्याही संघास गोल नोंदविता आला नाही. या सामन्यात झालेले पाचही गोल दुसऱ्या हाफमध्ये आले. ६५ व्या मिनिटाला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पेनल्टी शूट ऑऊट वर पोर्तुगालसाठी पहिला गोल डागला. हा गोल फुटबॉलच्या इतिहासातील ऐतिहासिक गोल ठरला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने या गोलद्वारे पाच विश्वचषकामध्ये गोल नोंदविण्याची विश्वविक्रमी कामगिरी बजावली. अशी कामगिरी बजावणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. (FIFA WC Portugal vs Ghana)

FIFA WC Portugal vs Ghana

यानंतर ७३ व्या मिनिटाला घानाचा कर्णधार आंद्रे एयू ने गोल डागत पोर्तुगालशी बरोबरी साधली. यानंतर पुन्हा ७८ मिनिटाला पोर्तुगालचा जोआओ फेलिक्स आणि ८० व्या मिनिटाला पोर्तुगालच्याच राफेल लियाओ यांनी गोल नोंदवले. यामुळे पोर्तुगालची आघाडी ३ – १ अशी झाली होती. ८९ व्या मिनिटाला घानाच्या ओसमान बुकारीने गोल डागून पोर्तुगालची आघाडी कमी केली. आता सामन्यात बरोबरीसाठी घानाला आणखी एका गोलची आवश्यकता होती. यासाठी घानाचे खेळाडू जीव तोडून प्रयत्न करत होते. (FIFA WC Portugal vs Ghana)

FIFA WC Portugal vs Ghana

निर्धारित खेळ संपल्यावर ९ मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला. या आधी कर्णधार रोनाल्डो हा बाहेर गेला होता. या शेवटच्या मिनिटात घाना खूप चिवट प्रतिकार करत होता. खेळ संपण्याच्या अगदी शेवटच्या क्षणात घानाला गोल डागण्याची संधी आली होती पण, ती पोर्तुगालच्या सतर्कतेमुळे हुकली. पोर्तुगालचा गोल किपर डिओगो कोस्टाकडे बॉल होता. त्याच्या कडून बॉल सुटला आणि त्यावर घानाच्या विल्यमसन या खेळाडूने ताबा मिळवला. यावेळी तो गोल डागणार तो पर्यंत पोर्तुगालच्या खेळाडुंनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी काही वेळासाठी पोर्तुगालचे खेळाडू आणि चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके थांबले होते. हा गोल झाला असता तर सामना बरोबरी सुटण्याची नामुष्की ओढावली असती. बाहेर असलेल्या कर्णधार रोनाल्डोने तर अक्षरश: डोक्याला हात लावला होता. पण, हा सामना अखेर पोर्तुगालच्या पारड्यात गेला.

अधिक वाचा :

Back to top button