Rohit on Suryakumar : कर्णधार रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वी केलेले ट्वीट पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण…

Rohit on Suryakumar
Rohit on Suryakumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावून दहशत निर्माण केली. माउंट मौनगानुई येथे झालेल्या सामन्यात त्याने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी केली. (Rohit on Suryakumar) या खेळीसह तो एका कॅलेंडर वर्षात दोन शतके झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. अशी कामगिरी रोहित शर्माने २०१८ साली केली होती.

सूर्यकुमारला गेल्या काही महिन्यांपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत कमी कालावधीत तो भारताचा आणि टी-२० क्रिकेटमधील जगातील नंबर एकचा फलंदाज बनला. न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमारने नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात शतक झळकावले होते. (Rohit on Suryakumar)

सूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच शतक करताना ११ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याने ४९ चेंडूत आपले शतक साजरे केले. सूर्यकुमारने टीम साऊथी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन यांच्यासह न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सूर्यकुमारच्या या शानदार खेळीनंतर रोहित शर्माचे ११ वर्षीपूर्वी केलेले ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

ट्विटमध्ये रोहितने सूर्यकुमारबद्दल लिहले होते. त्याने लिहिले चेन्नईमध्ये बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा पार पडला. भविष्यात काही प्रतिभावान क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची खेळी भविष्यात पाहण्यासारखी असेल. हे त्याचे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

सूर्यकुमारला मिस्टर ३६० म्हणूनही ओळखले जाते. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यातून धावा करण्याची क्षमता त्याच्यात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याने कव्हर्स आणि फाइन लेगवर जबरदस्त षटकार ठोकले. तो या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला. या वर्षी सूर्यकुमारने ३० टी-२० सामन्यांमध्ये ११५१ धावा केल्या आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ६ गडी गमावून १९१ धावा केल्या. टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर गारद झाला. भारताने हा सामना ६५ धावांनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा गोलंदाज सौदीने हॅट्ट्रिक केली. त्याने सलग तीन चेंडूंवर हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाद केले.

रोहितने ११ वर्षांपूर्वी केलेले ट्वीट चर्चेत येण्यामागचे कारण आहे. सूर्यकुमार यादवने गेल्या काही काळात केलेली कामगिरी आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news