World television day 2022 : टीव्हीबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? | पुढारी

World television day 2022 : टीव्हीबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीचे मूल्य आणि प्रभाव ओळखण्यासाठी दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन म्‍हणून साजरा केला जातो. (World television day 2022) बातम्या, मनोरंजन, शिक्षण, हवामान, आरोग्य, खेळ आणि  दैनंदिन माहितीसाठी टीव्‍ही हे एक महत्त्‍वाचे माध्‍यम आहे.

टीव्हीचा इतिहास

1924 साली जॉन लोगी बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला . यानंतर, 1927 मध्ये, फिलो फार्न्सवर्थ यांनी जगातील पहिला कार्यरत टेलिव्हिजन तयार केला,  01 सप्टेंबर 1928 रोजी त्‍याचे सादरीकरण करण्‍यात आले होते. जॉन लोगी बेयर्ड यांनी 1928 मध्ये रंगीत टेलिव्हिजनचा शोध लावला. तर टीव्‍हीचे सार्वजनिक प्रसारण 1940 पासून सुरू झाले.

World television day 2022  टेलिव्हिजनबद्दल काही मनोरंजक गोष्टी

 

  • पहिला इलेक्ट्रॉनिक टीव्ही ७ सप्टेंबर १९२७ रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये यशस्वीरित्या प्रदर्शित करण्यात आला. २१ वर्षांच्या फिलो टेलर फार्न्सवर्थ याने त्याची रचना केली होती.
  • बेयर्ड टीव्ही हा १९२९ मध्ये व्यावसायिकरित्या विकला गेलेला पहिला टीव्ही होता.
  • १९६३ मध्ये इतिहासात प्रथमच टेलिव्हिजनने माहितीचा स्रोत म्हणून वृत्तपत्रांना मागे टाकले. या वर्षीच्या एका सर्वेक्षणात, ३६% अमेरिकन लोकांना प्रिंटपेक्षा टीव्ही अधिक विश्वासार्ह स्त्रोत असल्याचे आढळले, ज्याला २४% लोकांनी पसंती दिली.
  •  टीव्हीवरील पहिली जाहिरात १ जुलै १९४१ रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रसारित झाली. ती जाहिरात एकूण २० सेकंद चालली.
  • टीव्ही जाहिरातींची किंमत त्यावेळी ९ डॉलर होती.
  • जगातील पहिली हाय डेफिनिशन टेलिव्हिजन प्रणाली १९३६ मध्ये मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झाली.
  • पहिला रंगीत टीव्ही सेट मार्च १९५४ मध्ये वेस्टिंगहाऊसने तयार केला होता.

  • सोनी वॉचमन हा जगातील पहिला पॉकेट टेलिव्हिजन होता, जो 1982 मध्ये सादर करण्यात आला होता.
  • 1954 पासून प्रसारित होणारा द टुनाईट शो हा जगातील दूरदर्शनवरील सर्वात जास्त काळ चालणारा टॉक शो आहे.
  • पहिला टेलिव्हिजन रिमोट १९५० मध्ये जेनिथने विकसित केला होता.
  • सुरुवातीच्या काळातील टीव्ही ब्लॅक व्हाईट कलरमध्ये प्रदर्शित होत असे.



  • सर्वात जास्त पाहिले गेलेले टीव्ही प्रसारण हे ऑलिम्पिक आणि फुटबॉल विश्वचषक यासारख्या जागतिक कार्यक्रमांचे असतात.
  • सध्या सॅमसंगचा नवीन वक्र UHD, 105-इंचाचा टीव्ही हा जगातील सर्वात मोठा टीव्ही आहे.

 

 

हेही वाचा

Back to top button