FIFA WC 2022 : भारतभूमीत खेळलेले ‘हे’ खेळाडू; चमकणार वर्ल्डकपच्या पटलावर

FIFA WC 2022
FIFA WC 2022
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू होणाऱ्या २२ व्या फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA WC 2022) असे अनेक फुटबॉलपटू खेळताना दिसणार आहेत. ज्यांनी भारतीय भूमीवरही आपले फुटबॉल कौशल्य दाखवले आहे. पाच वर्षांपूर्वी भारतात झालेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेले १२ फुटबॉलपटू यावेळी फिफा विश्वचषकात आप-आपल्या देशांसाठी वरिष्ठ संघात खेळताना दिसणार आहेत.

यामध्ये १७ वर्षांखालील विश्वचषकातील (FIFA WC 2022) सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गोल्डन बॉल जिंकणारा इंग्लंडचा खेळाडू फिल फोडन आणि पॅराग्वेविरुद्ध हॅट्ट्रिक करणारा आणि लायबेरियाचे अध्यक्ष, माजी फुटबॉलपटू जॉर्ज वेह यांचा मुलगा विंगर टीम वेह यांचादेखील समावेश आहे.

फिल फोडेन – इंग्लंड

पाच वर्षांपूर्वी अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फोडेनने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षकांना आपल्या खेळीने मंत्रमुग्ध केले होते. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये स्पेनने दोन गोलांची आघाडी घेतली होती. परंतु इंग्लंडटच्या फिल फोडेनने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे इंग्लंडने स्पेनचा ५-२ गोल फरकाने पराभव करत अंडर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. या सामन्यात फोडनने वैयक्तिक दोन गोलसह दोन असिस्ट केले होते.

फोडेनने स्पर्धेत एकूण तीन गोल केले. मँचेस्टर सिटीकडून फॉरवर्ड म्हणून खेळणारा २२ वर्षीय फोडेला कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. तो प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांच्या योजनांचा प्रमुख भाग आहे.

जोश सार्जेंट – अमेरिका

पाच वर्षांपूर्वी अमरजीत सिंगच्या नेतृत्वाखालील १७ वर्षांखालील भारतीय संघाने दिल्लीतील नेहरू स्टेडियमवर फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रथमच अमेरिकेशी सामना केला होता. या सामन्यात अमेरिकेने भारताचा ३-० ने पराभव केला होता. या सामन्यात सार्जेंटने केलेल्या कामगिरीमुळे त्याने चाहत्यांची प्रशंसा मिळवली. इंग्लिश क्लब नॉर्विच सिटीकडून खेळणारा सार्जेंट हा अमेरिकन संघातील आघाडीच्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे. फिफा विश्वचषकातही तो अमेरिकेकडून खेळताना दिसणार आहे.

टीम वेह – अमेरिका

१७ वर्षांखालील स्पर्धेत अमेरिकेच्या टीम वेह हे नाव खूप गाजले. याचे मोठे कारण म्हणजे त्याचे वडील जॉर्ज वेह. जॉर्ज लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते. निवडणूक लढवून ते देशाचे राष्ट्रध्यक्ष बनले. याआधी ते एक फुटबॉलपटू म्हणून प्रसिध्द होते. जॉर्ज यांनी पॅरिस सेंट-जर्मेन आणि एसी मिलानसाठी २१० सामन्यांमध्ये ७८ गोल केले आहेत. तो चेल्सी, मँचेस्टर सिटी, मार्सेल यांसारख्या युरोपमधील दिग्गज क्लबसाठीही खेळले आहेत.

टीमने अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये दाखवून दिले की त्याच्यातही फुटबॉल खेळण्याचे गुण आहेत. पॅराग्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात अमेरिकेने ५-० ने पराभव केला. या सामन्यात टीमने तीन गोल केले. तो सध्या फ्रेंच फुटबॉल क्लब लिलेकडून खेळत आहे.फिफा विश्वचषक स्पर्धेतील तो अमेरिकन फॉरवर्ड लाइनचा भाग आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news