दिग्गज फुटबॉलपटू Sadio Mane फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर

दिग्गज फुटबॉलपटू Sadio Mane फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर
Published on
Updated on

दोहा, पुढारी ऑनलाईन : कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फिफा विश्वचषक सुरू होत आहे. या फुटबॉल महाकुंभापूर्वीच सेनेगल संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड सादिओ माने (Sadio Mane) दुखापतीमुळे या जागतिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सेनेगल संघाने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत सादिओला फिफा विश्वचषक स्पर्धेतून वगळण्याची घोषणा केली आहे.

30 वर्षीय सादिओ मानेची (Sadio Mane) दुखापत हा देखील चर्चेचा विषय आहे कारण तो जगातील सर्वोत्तम फॉरवर्ड्सपैकी एक मानला जातो. सेनेगल संघाचे डॉक्टर मॅन्युएल अफोंसो यांनी सादिओ बाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले- 'बायर्न म्युनिकचा फॉरवर्ड सादिओ माने यापुढे वर्ल्ड कपमध्ये सेनेगलसाठी उपलब्ध असणार नाही. म्युनिकमध्ये त्याच्यावर पुढील उपचार होतील. आम्ही त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहिले. दुर्दैवाने त्याची रिकव्हरी अपेक्षेप्रमाणे होणार नसल्याचे यातून दिसत आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, सादिओ माने विश्वचषकातील काही सामने खेळेल, अशी शक्यता अफोंसो यांनी व्यक्त केली होती.

सादिओचे आतापर्यंत 33 गोल

सादिओ मानेने (Sadio Mane) सेनेगलसाठी 92 सामन्यांमध्ये 33 गोल केले आहेत. तो यापूर्वी इंग्लिश प्रीमियर लीग क्लब लिव्हरपूलकडून खेळला होता. तो आता बायर्न म्युनिकचे प्रतिनिधित्व करतो. दरम्यान, सादिओ दुखापतीतून सावरत होता. त्यानंतरही तो सावरेल असे सेनेगलच्या निवडकर्त्यांना वाटल्याने त्याला संघात ठेवण्यात आले. मात्र, तसे झाले नाही. सेनेगल आफ्रिकन कप ऑफ नेशन्सचा चॅम्पियन आहे. हा विश्वचषक खेळत असलेल्या आफ्रिकेतील 5 देशांपैकी एक आहे.

पहिला सामना नेदरलँडशी…

दर चार वर्षांनी होणाऱ्या या फुटबॉल महाकुंभात 32 संघ सहभागी होत असून, त्यांची प्रत्येकी चार-चारच्या आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. यजमान कतार, नेदरलँड्स आणि इक्वेडोर, सेनेगल हे संघ अ गटात आहेत. सेनेगलचा पहिला सामना 21 नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे. हा सामना रात्री 9 वाजल्यापासून खेळवला जाईल.

नेदरलँड्सचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डायक याने सादिओ मानेच्या अनुपस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माने हा लिव्हरपूलकडून खेळताना गेल्या हंगामाच्या अखेरीपर्यंत व्हॅन डायकचा सहकारी होता.

सादिओचे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणे माझ्या जिव्हारी लागले आहे. नेदलँड आणि सेनेगल अ गटात आहेत. आमचा सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. पण त्या सामन्यात सादिओ शिवाय खेळणे मनाला न पटणारे असेल. तो एक महान खेळाडू आहे. तो माझा माजी क्लब सोबती आहे. त्याच्या सोबत खेळणे ह एक अविस्मरणिय अनुभव असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news