Doodle FIFA World Cup
Doodle FIFA World Cup

Doodle FIFA World Cup : फुटबॉलचा आनंद घेण्यासाठी गुगलचं डुडलही तयार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून (20 नोव्हेंबरपासून) कतारमध्ये सुरुवात होत आहे. 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या आखाती देशात आयोजित केला जात आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत खेळवला जात आहे. या  फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी गुगलच डूडलही सज्ज झालं आहे. गुगलने आज होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनिमित्त खास डुडल (Doodle FIFA World Cup ) केलं आहे.

फिफा फुटबॉल विश्वचषक

आता गुगलही फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आजपासून (दि.२०) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या आखाती देशात आयोजित केला जात आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात रविवारी रात्री 9.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यापूर्वी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

Doodle FIFA World Cup : कसे आहे Google Doodle 

गुगलने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या थीमवर आधारित अॅनिमेटेड गुगल केले आहे. या डुडलमध्ये गुगलच्या लोगोमध्ये (अक्षरांमध्ये) इंग्रजी अक्षर ("O") ओ मध्ये फुटबॉल बनवण्यात आले आहे. तर गुगल (Google) अक्षराच्या खाली अॅनिमेटेड शूज तयार केले आहेत, जे एकमेकांना शुजने फुटबॉल मारत खेळत आहेत. या शूजमध्ये बनवलेले डोळे आणि स्मायलीच्या माध्यमातून कंपनीने फिफाच्या सुरुवातीची उत्सुकता दाखवली आहे. डूडलमध्ये, जेव्हा एक बूट फिरतो आणि दुसऱ्याला लाथ मारतो. तेव्हा दुसरा शूज उत्साहाने पहिल्याला लाथ मारतो.

आज होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पहिली मॅचही स्पर्धेचा आयोजक कतार आणि इक्वाडोरमध्ये होणार आहे. २०१८ मध्ये रशिया येथे झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा विजेता फ्रान्स झाला होता.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news