T20 World Cup मधील केएल राहुलच्या खराब फॉर्मवर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

T20 World Cup मधील केएल राहुलच्या खराब फॉर्मवर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० वर्ल्डकपमधील (T20 World Cup) केएल राहुलची (KL Rahul) आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. केएल राहुलने T20 वर्ल्डकपमध्ये ४,९ आणि ९ अशा एकूण आतापर्यंत केवळ २२ धावा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head coach Rahul Dravid) याने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केएल राहुलच्या फॉर्मबाबत भाष्य केले आहे. आम्ही शब्दांतून आणि कृतीतून गेल्या एका वर्षात दाखवून दिले आहे की आम्ही केएल राहुलच्या पूर्णपणे पाठीशी आहोत, असे द्रविडने म्हटले आहे.

"मला वाटते की तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे, त्याचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे. मला वाटते की त्याने याआधी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. T20I मध्ये हे असे घडू शकते, हे टॉप ऑर्डर फलंदाजांसाठी इतके सोपे नसते. ही स्पर्धा आव्हानात्मक आहे. मला वाटते पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क यांच्या विरुद्ध सराव सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. मला आशा आहे की पुढच्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी सुधारेल," असे द्रविड म्हणाला.

आम्हाला त्याची गुणवत्ता आणि क्षमता माहित आहे, तो सध्याच्या वातावरणासाठी खूप अनुकूल आहे. त्याला अष्टपैलू कामगिरी करण्याची चांगली संधी आहे. त्याने ज्या प्रकारे फटकेबाजी केली आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे द्रविडने पुढे म्हटले.

राहुलसोबत काही संवाद सुरु आहे का असे विचारले असता असता द्रविड म्हणाला की "आमचा खेळाडूंशी नेहमीच संवाद सुरुच असतो. पण त्याचा नेमका तपशील उघड करु शकत नाही. निर्धास्त रहा, त्याला माहित आहे की त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. या स्पर्धेत आमची बाजू काय आहे याबद्दल बरीच स्पष्टता आली आहे आणि आम्ही डगमगत नाही. आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे, तुम्ही वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या परिस्थितीत खेळताना पाहू शकता." असे द्रविडने सांगत राहुलची पाठराखन केली आहे.

"सध्याच्या परिस्थितीत आम्ही त्याला थोडा वेळ देऊ शकतो. आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. आम्हाला कोणतीही चिंता नाही. आम्हाला माहित आहे की जेव्हा तो जातो तेव्हा मला माहित आहे की तो काय परिणाम करू शकतो," असे त्यांनी नमूद केले आहे. (T20 World Cup)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news