पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने टी-२० विश्वचषकात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तर टी-२० विश्वचषकात १ हजार धावा पूर्ण करणारा विराट हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने ही कामगिरी केली होती. (Virat Kohli In T20 World Cup)
महेला जयवर्धनेनंतर टी-२० विश्वचषकात १००० धावा करणारा विराट दुसरा खेळाडू ठरला आहे. आज (दि.३०) टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पर्थच्या मैदानावर सुरू आहे. विराटने या सामन्यात ११ चेंडूमध्ये १२ धावा करत महेला जयवर्धेनेच्या विक्रमाशी बरोबरी केली. (Virat Kohli In T20 World Cup) मात्र टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा जयवर्धनेचा विक्रम तो मोडू शकलेला नाही.
जयवर्धने याचा टी-२०मधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी एका सामन्याची वाट पहावी लागणार आहे. महेला जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता १६ धावांची गरज आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली जयवर्धनेला लवकरच मागे टाकेल. रोहितची बॅट तळपल्यास तो यावर्षी कोहलीलाही मागे टाकू शकतो. कारण रोहित शर्मा ९०४ धावांसह तो चौथ्या क्रमांकावर आहे. (Virat Kohli In T20 World Cup)