AFG vs SL T-20 World cup : डी सिल्‍वाचे दमदार अर्धशतक, श्रीलंकेचा अफगाणिस्‍तानवर ६ गडी राखून विजय | पुढारी

AFG vs SL T-20 World cup : डी सिल्‍वाचे दमदार अर्धशतक, श्रीलंकेचा अफगाणिस्‍तानवर ६ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत आज अफगाणिस्‍तान विरुद्‍ध श्रीलंका आमने-सामने आहेत. ( AFG vs SL T-20 World cup  ) अफगाणिस्‍तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्‍तान संघाने श्रीलंकसमोर १४५ धावांचे आव्‍हान ठेवले आहे. या लक्ष्‍याचा पाढलाग करताना धनंजया डी सिल्‍वाच्‍या ६६  धावांच्‍या जोरावर श्रीलंकेने अफगाणिस्‍तानवर ६ गडी राखून विजय मिळवला.

डी सिल्‍वाच्‍या खेळीने अफगाणिस्‍तान बॅकफूटवर

धनंजया डी सिल्‍वाने दमदार अर्धशतक फटकावले. ४६ वर दोन बाद अशी संघाची स्‍थिती असताना डी सिल्‍वा मैदानात उतरला होता. त्‍याने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत ३६ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकार फटकावत आपलं अर्धशतक पूर्ण केले. त्‍याच्‍या या खेळीने श्रीलंकेचा विजय सुकर झाला.

अफगाणिस्‍तानचा डाव १४४ धावांवरच आटोपला

अफगाणिस्‍तानने सावध सुरुवात केली. पहिल्‍या दोन षटकांमध्‍ये केवळ सात धावा केल्‍या. पॉवर प्‍लेमध्‍ये सलामीवीर रहमनुल्‍लाह गुरबाज आणि उस्‍मान गनी यांनी ४२ धावांची भागीदारी केली. मात्र सातव्‍या षटकामध्‍ये गुरबाजला लहिरु कुमारने त्रिफळाचीत केले. त्‍याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावत २४ चेंडूत २८ धावा केल्‍या. ११ व्‍या षटकातील दुसर्‍या चेंडूवर अफगाणिस्‍तानला दुसरा धक्‍का बसला. २७ धावांवर खेळणारा उस्‍मान याने हसरंगाच्‍या गोलंदाजाीवर दासुन शनाकाकडे झेल देणे भाग पाडले.

१३ षटकामध्‍ये अफगणिस्‍तानला तिसरा धक्‍का बसला. इब्राहिम जादरान याला लहिरु कुमाराने भानुका राजपक्षेकरवी झेलबाद केले. जादरान याने १८चेंडूवर २२ धावा केल्‍या. यानंतर १६ व्‍या षटकामध्‍ये झटपट धावा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असलेल्‍या नजीबुल्लाह याने धनंजया डी सिल्वाच्‍या गोलंदाजीवर हसरंगाकडे झेल दिला. त्‍याने १६ चेंडूत एका चौकाराच्‍या मदतीने १८ धावा केल्‍या. १६ षटकांच्‍या खेळानंतर अफगाणिस्‍तानने चार गडी गमावत ११३ धावा केल्‍या होत्या.

१८ व्‍या षटकामध्‍ये गुलबदीन नायब हा १२ धावांवर धावचीत झाला. यानंतर राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी धावफलक हलता ठेवला. मात्र १९ व्‍या षटकामध्‍ये कसुन रजिताच्‍या गोलंदाजीवर शनाकाने नबीला झेलबाद केले. अखेरच्‍या षटकामध्‍ये हसरंगाने राशिद खानला त्रीफळाचीत केले. यानंतर अखेरच्‍या षटकातील शेवटच्‍या चेंडूवर १२ धावांवर खेळणार्‍या मुजीब उर रहमानला कुसल मेडिंसने यष्‍टीचीत केले. अफगाणिस्‍तानचा डाव १४४ धावांवर आटोपला. हसरंगाने ४ षटकांमध्‍ये केवळ १३ धावा देत ३ बळी घेतले.

श्रीलंकेची सावध सुरुवात, ‘पॉवर फ्‍ले’ अफगाणिस्‍तानच्‍या गोलंदाजांचे वर्चस्‍व

अफगाणिस्‍तानने दिलेल्‍या १४५ धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्‍या सलामीवीर पथुम निसांका आणि  कुसल मेंडिस यांनी  आठ धावा केल्‍या. दुसर्‍या षटकातील शेवटच्‍या चेंडूवर मुजीबने पथुम निसांका याला त्रिफळाचीत केले. त्‍याने १० वेंडूमध्‍ये दोन चौकार फटकावत १० धावा केल्‍या. फजलहक फारुकी याने तिसर्‍या षटकात श्रीलंकेच्‍या फलंदाजांना जखडून ठेवले. त्‍याने हे षटके निर्धाव टाकले. चार षटकांनंतर १ गडी गमावत श्रीलंकेने १४ धावा केल्‍या. फारीद अहमद पाचव्‍या षटकामध्‍ये सलग दोन चौकार फटकावत कुसल मेंडिसने दडपण कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. सहा षटकांच्‍या ( पॉवर फ्‍ले ) खेळानंतर श्रीलंकेने १ गडी गमावत २८ धावा केल्‍या आहेत. पॉवर फ्‍लेमध्‍ये अफगाणिस्‍तानच्‍या गोलंदाजांचे वर्चस्‍व राहिले.

पॉवर फ्‍लेनंतर श्रीलंकेचे कमबॅक

कुसल मेंडिस आणि धनंजया डी सिल्वा यांनी धावफलक हलता ठेवला. सात षटकानंतर गडी गमावत श्रीलंकेने ४२ धावा केल्‍या. आठव्‍या षटकात कर्णधार मोहम्मद नबी याने अफगाणिस्‍तानचा हुकमी एक्‍का, फिरकीपटू राशिद खानकडे चेंडू सोपवला. राशिद खानने हा विश्‍वास सार्थ ठरवत त्‍याने कुसल मेंडिसला यष्‍टीरक्षक रहमानुल्ला गुरबाजकरवी झेलबाद केले. मेडिसने २७ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार लगावत २५ धावा केल्‍या. दहा षटकानंतर श्रीलंकेने दोन गडी गमावत ६२ धावा केल्‍या.

११ व्‍या षटकान धनंजया डी सिल्‍वा याने राशिद खान एक षटकार, एका चौकार फटकावत दडपण कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. श्रीलंकाने या षटकात १४ धावा केल्‍या. यानंतर नबीला षटकात लगावत धाव फलक हालता ठेवला त्‍याचबरोबर धावा आणि चेंडूमधील अंतरही कमी केले. डि सिल्‍वा याने २५ चेंडूत ३६ करत  श्रीलंका सामन्‍यावर मजबूत पकड निर्माण केली. १४ व्‍या षटकामध्‍ये राशिद खानने चरित असलंकाला बाद केले. त्‍याने १८ चेंडूत १९ धावा केल्‍या. १५ व्‍या षटकामध्‍ये भानुका राजपक्षेने गुलबदीन नाईबला सलग दोन चौकार फटकावले या षटकात श्रीलंकेला १२ धावा मिळाल्‍या. यानंतर डी सिल्‍वाने उर्वरीत लक्ष्‍य पार करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, वनिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, लाहिरू कुमारा, कसुन रजिता.

अफगाणिस्‍तान संघ : रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, उस्मान गनी, नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), गुलबदीन नायब, अजमतुल्लाह ओमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी.

Back to top button