Rohit Sharma : दक्षिण आफ्रिकेविरूध्द हिटमॅनला ‘हे’ विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी

Rohit Sharma
Rohit Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी (दि.३० ऑक्टोबर) टीम इंडिया पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकविरूध्द भिडणार आहे. टीम इंडियाने ग्रुप 'बी' मधील दोन्ही सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. द.आफिकेविरूध्दच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आपल्या बॅटने झंझावाती खेळी करून 'हे' विक्रम आपल्या नावावर करू शकतो. जाणून घेऊयात त्या विक्रमांबद्दल…

दक्षिण आफिकेविरूध्दच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माची झंझावाती खेळी पाहायला मिळण्याची शक्याता आहे. याचे कारण म्हणजे आफ्रिकन संघाविरुद्ध खेळण्याच्या बाबतीत रोहितचे आकडे खूपच चांगले आहेत. आफ्रिकन संघाविरुद्ध टी-२० मध्ये ५०० हून अधिक धावा करण्याच्या विक्रमाला तो गवसणी घालू शकतो. हा विक्रम करण्यापासून रोहित फक्त ९५ धावांनी दूर आहे. रोहितने आत्तापर्यंत द. आफ्रिकेविरूध्द ४०५ धावा केल्या आहेत. यासोबतच रोहितला ५ षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकारांचा टप्पा पार करण्याची संधी आहे.

आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू (Rohit Sharma)

आफ्रिकेविरूध्द सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत प्रथम स्थानी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच्या नावावर ४०५ धावा आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना आहे. त्याने ३३९ धावा केल्या आहेत. तसेच भारताचा रनमशिन विराट कोहली ३०६ धावा करून यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

रोहितला ५०० षटकारांचा टप्पा पार करण्याची संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) रोहित शर्माला ५०० षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू बनण्याची मोठी संधी आहे. रोहितने आतापर्यंत ४२२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४९५ षटकार लगावले आहेत. आफ्रिकन संघाविरुद्ध ५ षटकार मारून तो ५०० षटकार मारणारा दुसरा खेळाडू बनू शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकार लगावले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकांसह ख्रिस गेल यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या खालोखाल रोहित शर्मा ४९५ षटकारांसह यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ४७६ षटकारांसह पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तिसऱ्या स्थानी आहे. यादीच्या चौथ्या स्थानी ३९८ षटकांसह ब्रेंडन मॅक्युलमचा समावेश आहे. तर मार्टिन गप्टिल ३८३ षटकारांसह यादीत पाचव्या स्थानी आहे.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि द.आफ्रिका ५ वेळा एकमेकांना भिडले आहेत. या पाचपैकी चार सामन्यात भारताने आफ्रिकेविरूध्द विजय मिळवला तर, एका सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवला आहे.

आफ्रिकेविरूध्द भारतीय गोलंदाजांचे ही पारडे जड

दक्षिण आफ्रिकेविरूध्द सर्वाधिक १४ विकेट घेत भुवनेश्वर कुमार प्रथम स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल १० विकेटसह भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आहे. ९ विकेट घेत हर्षल पटेल यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. युझवेंद्र चहल ७ विकेट घेत यादीत चौथ्यास्थानी आहे. तर, पाचव्या स्थानी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. त्याने द. आफ्रिकेविरूध्द ६ विकेट घेतल्या आहेत.

हेहि वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news