पाचवी कसोटी थेट रद्दच होणार? दिनेश कार्तिक बोलता बोलता काय म्हणाला.. | पुढारी

पाचवी कसोटी थेट रद्दच होणार? दिनेश कार्तिक बोलता बोलता काय म्हणाला..

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाचवी कसोटी थेच रद्दच होणार? : भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पाचव्या आणि अंतिम कसोटीबाबत साशंकता अधिक गडद झाली आहे. आज सामना सुरु होण्यासाठी काही तास बाकी असतानाच समालोचक दिनेश कार्तिकने केलेल्या ट्विटने सामना रद्द होणार की काय? याची चर्चा सुरु झाली आहे.

दिनेश कार्तिकने आपल्या ट्विटमध्ये आज खेळ होणार नाही ओके टाटा बाय बाय असे म्हटले आहे. त्यामुळे सामना रद्द तर झाला नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

पाचवी कसोटी थेच रद्दच होणार?  बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली सुद्धा साशंक

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी इंग्लंड आणि भारत पाचव्या कसोटीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. पाचव्या कसोटीआधी संघातील एक फिजीओ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांनी काल बोलताना सांगितले की, आम्हाला या घडीला सामना होईल की नाही हे काही माहित नाही. मला आशा आहे की खेळ होईल.

पीटीआयनेच दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंचा आरटी–पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्य भारत अरुण, नितीन पटेल आणि आर. श्रीधर हे विलगीकरणात गेले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा व शेवटचा क्रिकेट कसोटी सामना आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. या कसोटीद्वारे भारत इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे.

हा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णीत राहिला तर जवळपास 50 वर्षांनंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका विजयाची नोंद करता येणार आहे.

त्याशिवाय विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया (2018-19) आणि इंग्लंड (2021) मध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनेल. परंतु, गेल्या चार कसोटी सामन्यांप्रमाणे अंतिम संघाची निवड हा भारतीय संघ व्यवस्थापनेपुढील यक्ष प्रश्न असून, बुमराहचा वर्कलोड आणि अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button