T20 World Cup 2022 : कपिल देव यांचे धक्‍कादायक भाकित, “टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत…” | पुढारी

T20 World Cup 2022 : कपिल देव यांचे धक्‍कादायक भाकित, "टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतील साखळी सामन्‍यांना लवकरच सुरुवात होणार आहे. सध्‍या या स्‍पर्धेत पात्रता आणि सराव सामने सुरु आहेत. T20 World Cup 2022 कोण जिंकणार? या प्रश्‍नावर अनेक माजी खेळाडूंसह क्रीडा विश्‍लेषक आपलं मत व्‍यक्‍त करत आहेत. आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तर भारतीय क्रिकेट संघ या स्‍पर्धेत सेमीफायनलपर्यंत तरी जाईल का, याबाबतच शंका व्‍यक्‍त केली आहे. जाणून घेवूया टीम इंडियाच्‍या विश्‍वचषकमधील कामगिरीबाबत कपिल देव यांनी केलेल्‍या विधानाविषयी…

T20 World Cup 2022 : काय म्‍हणाले कपिलदेव?

लखनौ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कपिल देव म्‍हणाले की, “भारतीय क्रिकेट संघ सेमीफायनलपर्यंत जाण्‍याची शक्‍यता फारच कमी आहे. कारण टी-20 फॉर्मेट हा प्रकारचा असा आहे की, यामध्‍ये तुम्‍ही आज जिंकता तर उद्या तुम्‍हाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. भारत हा विश्‍वचषक जिंकू शकेल का, यावर आताच भाष्‍य करणे कठीण आहे. जर भारतीय संघ सूपर-4 मध्‍ये स्‍थान मिळवू शकला तरच यावर बोलता येईल. मात्र मला भारतीय संघ सूपर -4मध्‍ये जाईल का, याबाबतच काळजी आहे. मला असे वाटतं की, भारतीय संघ सेमीफायलनला जाण्‍याची शक्‍यता केवळ ३० टक्‍केच आहे.”

संघात जर अष्‍टपैलू खेळाडू असेल तर तो विश्‍वचषकासह तुम्‍हाला अन्‍य सामने जिंकून देण्‍यास मदत करतो. आज टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या हा असा अष्‍टपैलू खेळाडू आहे. हा खेळाडू ऑस्‍ट्रेलियात महत्त्‍वाची भूमिका बजावू शकतो. क्रिकेटमध्‍ये अष्‍टपैलू खेळाडूचे खूपच महत्त्‍व असते. हार्दिकचा संघात समावेश असल्‍याने कर्णधार रोहित शर्माला सहावा फलंदाज मिळणार आहे. तसेच तो उत्‍कृष्‍ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही आहे, असेही कपिल देव या वेळी म्‍हणाले.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button