

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma : भारतीय संघ शनिवारी ब्रिस्बेनला पोहोचला आहे जिथे त्यांना सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. सरावाच्या वेळी काही मुले मैदानावर खेळतानाही दिसली. त्यापैकी एका 11 वर्षीय मुलाच्या वेगवान गोलंदाजीचा रोहित शर्मा चाहता झाला. द्रुशील चौहान असे या मुलाले नाव आहे. या मुलाची गोलंदाजी आणि त्याच्या अॅक्शनने भारतीय कर्णधार इतका प्रभावित झाला की तो ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि किट घालून नेटमध्ये खेळायला गेला. या मुलाने नेटमध्ये रोहित शर्मालाही गोलंदाजी केली. (Rohit Sharma)
BCCI ने BCCI TV च्या अधिकृत वेबसाईटवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच ट्विटरवर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्या मुलाचा फोटो शेअर करत संपूर्ण व्हिडिओची लिंकही पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा रोहित शर्माला बॉलिंग करताना दिसत आहे आणि त्यानंतर रोहित त्याला ऑटोग्राफ देताना दिसतो. या व्हिडिओमध्ये द्रुशील स्वतः सांगतो की, त्याला क्रिकेटर व्हायचे आहे आणि त्याची गोलंदाजी पाहून रोहित शर्माने त्याला नेटमध्ये गोलंदाजी करण्यास बोलावले.
भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. पण 17 आणि 19 ऑक्टोबरला रोहित ब्रिगेड (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे दोन सराव सामने खेळणार आहे. सुपर 12 फेरीबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया ही पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेसह ग्रुप 2 मध्ये आहे. आता पात्रता फेरीनंतर आणखी दोन संघ या गटात सामील होतील.