

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या अभिनेत्रीने क्रिकेटपटूचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधल्याने दोघांमधील सोशल मीडिया युद्ध सुरू झाले होते. मात्र, काही काळ हे प्रकरण शांत राहिले. यानंतर उर्वशी रौतेला जेव्हा आशिया कप पाहण्यासाठी दुबईला पोहोचली तेव्हा हे प्रकरण पुन्हा एकदा पेटले होते. याच दरम्यान उर्वशीने पंतची माफीही मागितली होती. आता उर्वशी आणि ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
टीम इंडिया टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहचली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थमध्ये सराव सुरू केला आहे. आता हा टी-20 विश्वचषक पाहण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेलाही (Urvashi Rautela) ऑस्ट्रेलियाला दाखल झाली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे. उर्वशीही तेथे दाखल झाल्याने नेटिझन्स संतापले आणि त्यांनी मिम्स व्हायरल करून अभिनेत्रीला ट्रोल करण्य़ास सुरुवात केले.
इन्स्टाग्रामवर तिने लिहिले आहे की, मी माझ्या हृदयाचे ऐकले आणि ते मला ऑस्ट्रेलियात घेऊन आले. उर्वशी रौतेलाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर युजर्सनी तिची खिल्ली उडवली आहे. त्यांनी उर्वशी ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याने तिचे नाव ऋषभ पंतशी जोडण्यास सुरुवात केली आहे.
टी २० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणार आहे आणि यात टीम इंडियामध्ये ऋषभ पंत सामिल आहे. अता उर्वशी ऑस्ट्रेलियात गेल्याने सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. उर्वशीच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, "आमच्याकडे अजून काही आठवडे बाकी आहेत, आपण वर्ल्ड कप कुठेतरी शिफ्ट करू शकतो का". तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "दीदीने छोट्या भावाची पाठ सोडली नाही. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ऋषभचे लक्ष विचलित करण्यासाठी उर्वशी ऑस्ट्रेलियात पोहचली आहे. चला तर मग पाहू या हे मजेदार मीम्स-
हेही वाचा