Intel Announce Job Cuts : ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात | पुढारी

Intel Announce Job Cuts : ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी करणार कर्मचाऱ्यांची मोठी कपात

पुढारी ऑनलाईन : दिग्गज आयटी कंपनी इंटेल सध्या आपले कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इंटेल (Intel) लवकरच आपल्या कर्मचार्‍यांना काढून टाकू शकते. अहवालात दावा करण्यात आला आहे की, वैयक्तिक संगणक बाजारपेठेतील मंदीमुळे हेड अकॉऊंट विभागातून कर्मचारी कपात करण्याच्या योजनेवर इंटेल कंपनी विचार करत आहे. कर्मचाऱ्यांचा हा आकडा हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. (Intel Announce Job Cuts)

अहवालानुसार, इंटेल लवकरच कर्मचारी कमी करण्याची घोषणा करु शकते. इंटेल आपल्या काही विभागातील जसे विक्री आणि विपणन इतर विभागातून सुमारे 20 टक्के कर्मचारी कमी करू शकतात. ब्लूमबर्ग दिलेल्या बातमीनुसार कंपनीचे जुलैपर्यंत 1,13,700 कर्मचारी होते. मात्र इंटेलने कर्मचारी कपातीच्या बातम्यांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. (Intel Announce Job Cuts)

Intel Announce Job Cuts

  • इंटेलची स्थिती का बिघडली (Intel Announce Job Cuts)

जुलैमध्ये, कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीतील अहवालानंतर वार्षिक विक्री आणि नफ्याचा अंदाजपत्रकात घट केली आहे. अलिकडच्या काळात वाढत्या महागाई दरांमुळे आणि पुन्हा कार्यालये आणि शाळा सुरू झाल्यानंतर लोकांनी पर्सनल कॉम्युटरवरील खर्च कमी केला आहे. कोरोना काळात संगणक विक्री वाढली होती. लॉकडाऊनमध्ये घरातून काम करताना (Work From Home) संगणक हे महत्त्वाचे साधन बनले होते.

चीनमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती आणि युरोपमधील युक्रेन रशिया युद्ध यामुळे चीप बनविणाऱ्या इतर कंपन्या देखील अडचणीत आहेत. या कारणामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून याचा थेट परिणाम मागणीवर होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button