IND vs SA : क्रिकेटच्या मैदानावर तब्बल ९२ वर्षानंतर पुन्हा घडली ‘ती’ गोष्ट! | पुढारी

IND vs SA : क्रिकेटच्या मैदानावर तब्बल ९२ वर्षानंतर पुन्हा घडली ‘ती’ गोष्ट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका मंगळवारी पार पडली. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेली तिसरी वनडे जिंकून भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने खिशात टाकली. या मालिकेतील अंतिम सामन्यात आफ्रिकन संघाने या आगळा-वेगळा विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे कर्णधार म्हणून पदार्पण केले. मिलरने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताच दक्षिण आफ्रिकन संघाने एक आगळा-वेगळा विक्रम आपल्या नावे केला. (IND vs SA)

आजचा अंतिम सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या उद्देशाने डेव्हिड मिलर नाणेफेकीसाठी मैदानात आला. त्यावेळी आफ्रिकन संघाने हा विक्रम केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाचा कर्णधार टेंबा बवुमाने संघाचे नेतृत्व केले. दुसऱ्या सामन्यात केशव महाराज याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरलेला. तर मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून डेव्हिड मिलर मैदानात उतरला. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका मालिकेतील सर्वच सामन्यांत वेगवेगळे कर्णधार खेळवण्यात आले. (IND vs SA)

९२ वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटना

अशी घटना कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेळा घडली आहे. १९०२ साली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत संघाने तीन कर्णधार वापरलेले होते. त्यानंतर १९३० मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत चार वेगवेगळ्या कर्णधारांसोबत चार सामन्यांची मालिका खेळली होती. त्यानंतर ९२ वर्षानंतर एका मालिकेतील तीन सामन्यात वेगवेगळे कर्णधार पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळाली.

हेही वाचा;

Back to top button