Mohammed Shami : जसप्रीत बुमराहला पर्याय मोहम्मद शमी? काय म्हणाले प्रशिक्षक राहुल द्रविड

Mohammed Shami : जसप्रीत बुमराहला पर्याय मोहम्मद शमी? काय म्हणाले प्रशिक्षक राहुल द्रविड
Published on
Updated on

इंदौर; पुढारी ऑनलाईन : पाठीच्या दुखण्यामुळे भारताचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अखेर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकातून (T20 World Cup 2022) बाहेर पडला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहचा पर्याय कोण असेल हे अद्याप निश्चीत झाले नाही. पण, बुमराहला पर्याय म्हणून मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) नाव चर्चेत आहे. विश्व चषकासाठीच्या संघात शमीला ठेवण्यात आले आहे. पण, भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास टाकणार का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सर्वांबाबत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भाष्य करत बुमराहचा पर्याय कोण असेल या बाबत खुलासा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. या सामन्यात भारताने अधीक गोलंदाजांना संधी दिली होती. परंतु या सर्वांची कामगिरी सुमार ठरली. या आधीच्या सामन्यात भारताने मोठ्या लक्षाचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला दिले होते. परंतु, तेथे सुद्धा आफ्रिकेने भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत मोठ्या लक्षापर्यंत पोहचण्याचा जवळ जवळ प्रयत्न केला होता. या आधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आणि आशिया चषकाच्या स्पर्धेतसुद्धा भारताची गोलंदाजी सुमार दर्जाची ठरली होती. या सर्वांमागे महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह नसणे हेच आहे. पण, दुखापतीमुळे तो विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत नसणार आहे. त्याच्या शिवाय या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ उतरणार आहे. यामुळे भारतीय संघ व्यस्थापनापुढे बुमराहच्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. (Mohammed Shami)

राहुल द्रविड म्हणाले, बुमराहसाठीच्या पर्यायांचा विचार केला जात आहे. या जागी अनुभवी गोलंदाज असावा असे आम्हा सर्वांना वाटत आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोविड नंतर एनसीएमध्ये तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याचे कोविडमधून बाहेर आल्यानंतरचे अहवाल पाहून त्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल. तो आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये हवा होता पण, तसे झाले नाही. आमच्याकडे १५ ऑक्टोंबर पर्यंतचा अवधी आहे. तो पर्यंत शमीला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आले आहे.

या विषयी द्रविड पुढे म्हणाले, आमच्यासाठी दीपक चहरचा सुद्धा चांगला पर्याय आहे. तो थोडीफार फलंदाजी सुद्धा करु शकतो आणि डेथ ओव्हरमध्ये त्यांची गोलंदाजी चांगली आहे. बुमराहच्या जागी कोण हे १५ ऑक्टोंबरनंतर निश्चित होईल. यावेळी गोलंदाजीमध्ये सुधाराची आवश्यकता असल्याचे द्रविड यांनी कबुल केले. तसेच यावर उपाय शोधले जात असून त्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याची माहिती राहुल द्रविड यांनी माध्यमांना दिली. (Mohammed Shami)


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news