मुंबई : रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी | पुढारी

मुंबई : रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन: आज दुपारी १२.५७ वाजता मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर हा धमकीचा कॉल आला, त्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल एका अनोळखी नंबरवरून आला होता. फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेऊन ही धमकी दिली. कॉलरने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

याआधीही रिलायन्स फाऊंडेशनच्या या हॉस्पिटलच्या लँड लाईनवर कॉल आला होता आणि फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबाला धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हॉटेल ललितला बॉम्बची धमकी

ऑगस्ट महिन्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेललाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ कोटींची मागणी केल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यातही घेतले होते. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाकडे कॉलद्वारे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर 3 कोटींची मागणी करण्यात आली. स्फोट होऊ नये म्हणून हॉटेल प्रशासनाला ५ कोटी द्यावे लागतील, अशी धमकी एका व्यक्तीने फोनवर दिली होती.

Back to top button