नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जागतिक फुटबॉल संघटना (फिफा) ने भारताचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याचा गौरव केला असून त्याच्या सन्मानार्थ तीन भागाची एक मालिका जारी केली आहे. भारताच्या सर्वात यशस्वी फुटबॉलपटूंपैकी एक असलेला छेत्री देशाकडून सर्वाधिक गोल करणारा आणि सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने 12 जून 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केल्यानंतर 131 आंतरराष्ट्रीय सामन्यात 84 गोल केले आहेत. तो मेस्सी (90) आणि रोनाल्डो (113) यांच्यापाठोपाठ तिसर्या स्थानावर आहे. फिफाने या तिघांचे एकत्रित छायाचित्रही प्रकाशित केले आहे.
फिफाने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, आपण रोनाल्डो आणि मेस्सीला ओळखताच. आता तिसर्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणार्या खेळाडूंविषयी जाणून घ्या. फिफाच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दाद दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये खूपच छान सुनील छेत्री (Sunil Chhetri). यामुळे भारतात फुटबॉलला आणखी सन्मान मिळेल.
अधिक वाचा :