विराट कोहली चित्त्यासारखा धावून फिल्डिंग करतोय, माजी कोचचं मोठे वक्तव्य | पुढारी

विराट कोहली चित्त्यासारखा धावून फिल्डिंग करतोय, माजी कोचचं मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : पुढारी डेस्क; टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची फलंदाजी पुन्हा बहरली आहे. आशिया कप नंतर ऑस्ट्रेलिया विरोधातील टी-२० मालिकेत विराटने चांगली फलंदाजी केली. या पार्श्वभूमीवर भारती क्रिकेट संघाचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी विराट कोहली याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ”केवळ विराटची बॅटिंगच नाही तर त्याची फिल्डिंग सुधारली आहे. हा एक नवीन विराट आहे. त्याच्यात प्रचंड उत्साह दिसत असून त्याच्यात सकारात्मकेची कोणतीही कमी दिसत नाही.” असे आर श्रीधर यांनी म्हटले आहे.

सुमारे एक महिना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर विराटने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली. गेल्या आठ डावांत विराटने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. विराटने शतकी खेळी अफगाणिस्तान विरोधात केली. याआधी खराब फॉर्ममुळे विराटवर जोरदार टीका झाली होती. याचदरम्यान रविवारी ऑस्ट्रेलिया विरोधात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात विराटने ६३ धावांची विजयी खेळी केली. यामुळे भारताचे माजी फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी विराटच्या खेळाचे कौतुक केले आहे.

विराट अजूनही एका मजबूत स्थितीत आहे. त्याने याआधी म्हटले होते की त्याची काही दिवस मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. पण आता त्याने कमबॅक केले आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यातील त्याची फलंदाजी पाहून म्हणू शकतो की किंग इज बॅक. त्याशिवाय श्रीधर यांनी म्हटले आहे की तो चित्त्यासारखी फिल्डिंग करत आहे. तो दमदार फलंदाजी करत आहे आणि आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याचा परतलेला फॉर्म टीम इंडियासाठी महत्वाचा आहे.

हे ही वाचा :

Back to top button